शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

पाटीलनगर, सिडको : उंटवाडी पुलाखाली उभारा भुयारीमार्ग; चक्रीबसची संख्या वाढवा

By admin | Updated: March 13, 2015 23:41 IST

कुठे आहे सार्वजनिक स्वच्छतागृह ?पाटीलनगर,

सिडको : पेठे हायस्कूलमागील दत्तमंदिर परिसरात वाढती लोकवस्ती लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छतागृह आणि महिलांसाठी प्रसाधनगृहाची उभारणी करावी, रस्त्यांवर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने गतिरोधक बसवावेत, चक्रीबस सेवेत वाढ करावी, उंटवाडी पुलाखाली भुयारीमार्गाची उभारणी व्हावी...आदिंसह विविध समस्यांचा वर्षाव नागरिकांनी ‘लोकमत तुमच्या दारी’या उपक्रमात बोलताना केला. ‘लोकमत’च्या टीमचा मुक्काम शुक्रवारी सिडकोतील पाटीलनगर, दत्तमंदिर परिसरात होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रामुख्याने, पाटीलनगर, त्रिमूर्तीचौक, शिवशक्तीनगर, दुर्गानगर आदि परिसरात लोकवस्ती वाढते आहे; परंतु सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. विशेषत: महिलांची कुचंबणा होते. परिसरातील नागरिकांची नेहमीच उंटवाडी पुलावरून ये-जा सुरू असते. परिसरातच पेठे शाळा असल्याने शालेय मुलांचीही वर्दळ असते; परंतु पुलावरून ये-जा करताना अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे उंटवाडी पुलाखाली भुयारीमार्गाची उभारणी झाल्यास अपघातांना आळा बसू शकेल. परिसरातील स्वच्छतेबाबतही नागरिकांची ओरड आहे. चक्रीबससेवा सुरूकरण्याची गरज आहे.