शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

वहिवाट रस्ता होणार मोकळा

By admin | Updated: August 23, 2016 00:02 IST

पाटोदा दहेगाव शिवार : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

पाटोदा : येवला तालुक्यातील दहेगाव पाटोदा येथील जाधव वस्ती ते धनवटे वस्ती या रस्त्यावर अतिक्रमण करून वहिवाट रस्ता नांगरल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या ईमारत व दळणवळण येवला उपविभाने तहसिलदारांसह संबंधित शेतकरी अशोक पवार यांना सदर रस्त्यावरील अतिक्रमण दूर करावे अशा आशयाचे पत्र दिले आहे. पत्रामुळे या मार्गावरून येजा करणाऱ्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जाधव वस्ती ते धनवटे वस्ती या रस्त्यावर अशोक पवार यांनी अतिक्रमण करून वहिवाट रस्ता नांगरल्याने शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ६ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेवुन संबंधित विभागाने सदरचे पत्र दिल्याने हे अतिक्रमण दूर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. येथील श्री रामचंद्र बंडू घोरपडे व ग्रामस्थ शेतकऱ्यांनी संबधित विभागाकडे तक्रार करून अतिक्रमण रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या ईमारत व दळणवळण येवला उपविभागाने रस्त्याची समक्ष पाहणी केली असता अशोक पवार या शेतकऱ्याने आपल्या जमिनीलगतच्या दोन मीटर रुंदीत व लांबीत सुमारे साठ मीटर रस्ता नांगरून अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. रस्त्याची लांबी, रूंदी कमी करून रस्त्याची अलाईनमेंट बदलली असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले.दरम्यान जिल्हा परिषदेच्या इमारत व दळणवळन विभागाने येवला तहसीलदारांनाही या संदर्भात १८ आॅगस्ट रोजी स्वतंत्र पत्र पाठवुन आपल्या स्तरावर सदरच्या रस्ता मोकळा करुन देण्यासंदर्भात संबंधितास समज देण्यात यावी असे असे सुचविले आहे. इवद विभागाचे उपअभियंत्यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे. तहसीलदारांनी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी आता संबंधित शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, संबधित विभागाने पवार यांना लेखी व तोंडी सूचना देवूनही अद्यापपर्यंत अतिक्रमित रस्ता मोकळा न केल्याने या भागातील शेतकऱ्यांचे काढणीस आलेले टमाटा पिक रस्त्याअभावी शेतातच खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)