शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी चोरट्यांची दहशत

By admin | Updated: August 23, 2015 22:20 IST

मंगळसूत्र चोरले : पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

लासलगाव : येथील डॉक्टर  बंदछोडे  हॉस्पिटलजवळ शनिवारी दुपारी चार  वाजता खरेदी करून घरी जाणार्‍या  तीन महिलांपैकी एका महिलेच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्न अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. सुजाता बिश्‍वास असे या महिलेचे नाव आहे. लासलगाव येथील  बाजारपेठेतील खरेदी करून घरी परतत असताना चोरटे गाडीवर आले. मंगळसूत्न  हिसकावून  पलायन करणार्‍या चोरट्यांचा एका युवकाने  पाठलागही केला. या महिलांनी बरीच आरडाओरड केली. याबाबत लासलगाव पोलिसांत फिर्याद दाखल  झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतत होणार्‍या चोर्‍यांमुळे लासलगाव परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली असून, नागरिक भयभीत झाले आहेत.लासलगाव येथील गणेशनगर, विद्यानगर, लासलगाव महाविद्यालय रस्त्यावर गेल्या तीन महिन्यांत पाच ते सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे  दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. परंतु त्याचा तपास लागलेला नाही. गेले काही दिवस लासलगाव शहरासह पिंपळगाव  नजीक तसेच शास्त्रीनगर परिसरात चोरटे येत असल्याच्या भीतीने युवक जागरण करीत गस्तीवर दिसत आहेत. विंचूर भागात तर वस्तीवर राहणारे  शेतकरी आपल्या घराभोवती रात्नभर मोठय़ा प्रकाशझोताचे दिवे लावीत आहेत. रात्नी व दिवसा अनोळखी दिसणार्‍या लोकांकडे चोर असल्याच्या  नजरेतून लोक पाहतात. अशा घटना दररोज होताना दिसून येत आहेत. चोरट्यांनी धुमाकूळ घालत रात्नीतून चार ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच रात्नीत चार घरफोड्या झाल्या आहेत.दीड महिन्यापूर्वी रविवारी रात्नीच्या सुमारास  चोरट्यांनी बालाजीनगर येथील डॉ. श्रीनिवास दायमा यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून   चार तोळे सोने, चांदी शिक्के असा सुमारे ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शांतीलाल चंडालिया यांच्या राहत्या घरी, मापारी यांच्या दुकानात आणि श्रीमती दगडे यांचे टायरचे दुकानही फोडण्यात आले.  शहरात एकाच रात्नीत झालेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. लासलगाव येथील सरस्वती शाळेतील शिक्षक असलेले धर्मेश साजन निकम हे आपल्या कुटुंबासोबत आपल्या मूळगावी वाखरवाडी (ता. देवळा) येथे कार्यक्रमासाठी गेले होते. घरात कोणीही व्यक्ती नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून ६९ हजार रु पयांचा  ऐवज चोरून नेल्याची  घटना घडली.सर्व्हे नंबर ९३ मध्ये फुलचंद रतनचंद दगडे यांचे राजेश एजन्सी नावाने होलसेल मसाला विक्र ीचे दुकान आहे. शुक्र वार, दि. १0 ऑगस्टला मध्यरात्नी दुकानाचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. काजूचे दहा किलोचे पन्नास डबे व बदामबीचे वीस कट्टे असा एकूण ७0 हजार रु पयांचा माल चोरून नेला आहे. दोन महिन्यांपूर्वी  उमराणे येथील व्यापार्‍याचे काही लाख रु पये गाडीची काच फोडून लुटून नेले. संशयिताचे रेखाचित्न मिळूनदेखील अद्यापपर्यंत तपास हा गुलदस्त्यात आहे. लासलगाव येथील  सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी श्यामसुंदर मालपाणी यांच्यावर केलेल्या गोळीबारातील आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे; परंतु त्यानंतर एकाही गुन्ह्याचा तपास  लागलेला नाही.  तीन महिन्यांत परिसरामध्ये लहानमोठय़ा आठच्या वर चोरीच्या घटना घडलेल्या असून, अद्यापपर्यंत एकाही गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. (वार्ताहर)