पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्याने धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:02 PM2019-11-02T23:02:35+5:302019-11-02T23:03:39+5:30

चांदवड : परतीच्या पावसामुळे चांदवड येथील देवी हट्टीजवळील नदीला रात्री एक वाजता महापूर आल्याने नदीकडेला असलेल्या आठवडेबाजार तळातील पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्यामुळे तेथील पांचाळ वस्तीतील नागरिकांचे संपूर्ण संसार, वस्तू व अन्नधान्य, त्यांची कामाची हत्यारे पुरात वाहून गेल्याने जवळजवळ पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Panchal settlements run into flood water | पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्याने धावपळ !

पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्याने धावपळ !

Next
ठळक मुद्देदोन चार दिवसांचे अन्न पुरेल एवढी मदत केली.

चांदवड : परतीच्या पावसामुळे चांदवड येथील देवी हट्टीजवळील नदीला रात्री एक वाजता महापूर आल्याने नदीकडेला असलेल्या आठवडेबाजार तळातील पांचाळ वस्तीत पुराचे पाणी घुसल्यामुळे तेथील पांचाळ वस्तीतील नागरिकांचे संपूर्ण संसार, वस्तू व अन्नधान्य, त्यांची कामाची हत्यारे पुरात वाहून गेल्याने जवळजवळ पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  त्यांना मदतीचा हात देण्यासाठी चांदवडचे नगरसेवक देवीदास त्र्यंबक शेलार यांनी पांचाळ वस्तीतील नागरिकांचे हाल बघून त्यांना दोन चार दिवसांचे अन्न पुरेल एवढी मदत केली.
मात्र या नदीतील घाण, कचरा पावसाळ्याच्या आत नगर परिषदेने न काढल्याने या लेंडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी २००५ मध्ये अशा प्रकारचा पूर आल्याने याच पांचाळ वस्तीतील तरुण वाहून गेल्याची आठवण चांदवडकरांना अजूनही स्मरणात आहे.
मोठ्या प्रमाणात कचरा व घाण अडकल्याची बाब लक्षात येताच चांदवड नगर परिषदेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने तातडीने कचरा काढण्यात आला. पांचाळवस्तीत पाणी घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन अहेर, संदीप उगले, राजेंद्र शेलार, कुंदन शेलार, सुधाकर परदेशी, राजाभाऊ अहिरे आदींसह नागरिक उपस्थित होते. तर पांचाळ वस्तीत जवळच असलेल्या स्वच्छतागृहाचे घाण पाणी या नागरिकांच्या घराजवळून जात असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. सदर स्वच्छतागृहाचे घाण पाणी आमच्या दारातून जाते याची तक्रार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे केली असता ते ही जागा तुमची नसल्याचे उत्तर देतात. यावेळी अन्नधान्य वाटप केले असता लीलाबाई दशरथ सोनवणे या महिलेने आम्हाला कोणीतरी जीवदान दिल्याचे सांगून या महिलेला गहिवरून आले.

Web Title: Panchal settlements run into flood water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.