त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी नाशिक रोड परिसरात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला अपशब्द वापरुन मारहाण करीत भिंतीवर ढकलून देणाऱ्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेला जिल्हा शल्य चिकित्सकांनी निलंबित केले. ...
कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यातील कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथे गाड्या लोडिंग करणाऱ्या कामगारांच्या संपानंतर कांद्याच्या बाजारभावात २०० रुपयांनी वाढ झाली. ४५०० रुपयांचा भाव जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथील डॉ. आंबेडकर नगरातील मच्छिंद्र निवृत्ती कांबळे (४०) या इसमाने आपल्या राहत्या घरात आढ्याला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
इगतपुरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आक्रमक झाले असताना, जिल्ह्यातील इगतपुरी येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी मात्र संप मागे घेत प्रवाशांच्या सेवेसाठी तत्परता दाखवली आहे. ...
सुरगाणा : तालुक्यातील ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना हक्काचे घरकूुल मिळावे यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सुरगाणा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
सटाणा : संपूर्ण कसमादे परिसराचे लक्ष लागून असलेल्या एचडीएफसी बँकेच्या सटाणा शाखेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सटाणा न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. एचडीएफसी बँकेकडून सटाणा पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करूनही पोलिस ...