जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २२) एकूण १५६ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, काल नाशिक मनपा क्षेत्रातच एक मृत्यू झाला असून त्यामुळे बळींची संख्या २,०३७ वर पोहोचली आहे. ...
जिल्ह्यातील काही भागात आढळलेले मृत कावळे आणि अन्य पक्षी यांचे नमुने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून, या पक्ष्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असले तरी हे सर्व पक्षी स्थलांतरित असल्यामुळे जिल्ह्याला बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे पशुवैद्य ...
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषी महोत्सवास शुक्रवार ( दि. २२) पासून प्रारंभ झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन सेवामार्गाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते माती पूजन करून झाल ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तत्काळ चौकशी अहवाल सादर करुन या प्रकरणात दो ...
नांदगाव : कोट्यवधीच्या थकबाकीवरुन गिरणा धरणाचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्याने योजनेवरील नांदगाव शहरासह दोन लाखांहून अधिक ग्रामीण लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा बाका प्रसंग उद्भवला आहे. त्यात सद्यस्थितीत सुरु असलेल्या पाणी प ...
मनमाड: रेल्वे प्रशासनाकडून सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आलेल्या अमरावती मुंबई विशेष रेल्वे गाडीला अखेर हिरवा कंदिल मिळाला असून ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत मका (भुसार)च्या दरात तब्बल दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत वाढ होत सर्वोच्च १५०१ रुपये दराने विकला गेला. ...
येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवीत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक ...
सिन्नर : तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थक परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व सात जागांवर विजय मिळवत विरोधी श्री स्वामी समर्थ पॅनलचा धुव्वा उडवला. ७ जागांसाठी परिवर्तन पॅनल व श्री स्वामी समर्थ पॅनल यांच्यात सरळ लढत झाल ...
सिन्नर : तालुक्यातील पास्ते ग्रामपंचायतीत माजी सरपंच जयंत आव्हाड, माधव आव्हाड, राजेश घुगे यांच्या नेतृत्वातील स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलला काठावर बहुमत मिळाले आहे. या पॅनलला ९ पैकी ५ जागांवर विजय मिळविता आला. विरोधी शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला ४ जाग ...