अनकाई ग्रामपंचायतीत सत्तापरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 07:29 PM2021-01-22T19:29:51+5:302021-01-23T00:56:21+5:30

येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवीत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती पॅनलला अवघी एक जागा मिळाल्याने दारुण पराभव स्वीकारावा लागला.

Change of power in Ankai Gram Panchayat | अनकाई ग्रामपंचायतीत सत्तापरिवर्तन

अनकाई ग्रामपंचायतीत सत्तापरिवर्तन

Next
ठळक मुद्दे नवनिर्माण पॅनलला दहा जागा ; ग्रामविकासला एक जागा

वॉर्डनिहाय विजयी उमेदवारात वॉर्ड क्र. १ मध्ये प्रतिभा बोराडे, वैशाली गांगुर्डे, वॉर्ड क्र. २ मध्ये राजाराम पवार, नगिना कासलीवाल, पंचफुला दळवी, वॉर्ड क्र. ३ मध्ये अल्केश कासलीवाल, शिवम अहिरे, सविता टिटवे, वॉर्ड क्र. ४ मध्ये डॉ. प्रीतम वैद्य, सागर सोनवणे, शोभा जाधव यांचा समावेश आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गावात गुलाल उधळूण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. प्रारंभी, स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना नवनिर्माण विकास पॅनलचे नेते अल्केश कासलीवाल यांनी गावविकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून, निवडणूक काळात दिलेल्या वचनांची पूर्ती केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी बाबूलाल कासलीवाल, त्र्यंबक बढे, शांताराम पवार, चंद्रभान व्यापारे, दत्तू सोनवणे, किरण बढे, बाळू बोराडे, अशोक बोराडे, मारुती वैद्य, उत्तम देवकर, संतोष सोनवणे, अशोक देवकर, तुषार अहिरे, बाळू चव्हाण, मेहबूब पठाण, राजू परदेशी, मुकेश परदेशी, अप्पा सोनवणे, भगवान जाधव, सागर परदेशी, संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती.
माय-लेक विजयी
अनकाई ग्रामपंचायतीत नगिना कासलीवाल व अल्केश कासलीवाल हे माय-लेक विजयी झाले आहेत. माय-लेक विजयी होण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

Web Title: Change of power in Ankai Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.