नाशिक मनपा क्षेत्रात कोरोनामुळे एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 01:36 AM2021-01-23T01:36:01+5:302021-01-23T01:36:53+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २२)  एकूण १५६ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, काल नाशिक मनपा क्षेत्रातच एक मृत्यू झाला असून त्यामुळे बळींची संख्या २,०३७ वर पोहोचली आहे.

One death due to corona in Nashik Municipal Corporation area | नाशिक मनपा क्षेत्रात कोरोनामुळे एक मृत्यू

नाशिक मनपा क्षेत्रात कोरोनामुळे एक मृत्यू

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २२)  एकूण १५६ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, काल नाशिक मनपा क्षेत्रातच एक मृत्यू झाला असून त्यामुळे बळींची संख्या २,०३७ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ४६९ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ११ हजार १५३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,२७९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.१० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.६८, नाशिक ग्रामीण ९६.३९, मालेगाव शहरात ९३.५१, तर जिल्हाबाह्य ९४.४९ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ८१ हजार ५९ असून, त्यातील ३ लाख ६२ हजार ९४५ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १४ हजार ४६९ रुग्ण बाधित आढळून आले असून, ३,६४५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: One death due to corona in Nashik Municipal Corporation area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.