पास्ते येथे स्व.मुंडे पॅनलला काठावर बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 07:23 PM2021-01-22T19:23:32+5:302021-01-23T00:54:01+5:30

सिन्नर : तालुक्यातील पास्ते ग्रामपंचायतीत माजी सरपंच जयंत आव्हाड, माधव आव्हाड, राजेश घुगे यांच्या नेतृत्वातील स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलला काठावर बहुमत मिळाले आहे. या पॅनलला ९ पैकी ५ जागांवर विजय मिळविता आला. विरोधी शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला ४ जागांपर्यंत पोहोचता आले.

Late Munde panel at Paste past majority | पास्ते येथे स्व.मुंडे पॅनलला काठावर बहुमत

पास्ते येथे स्व.मुंडे पॅनलला काठावर बहुमत

googlenewsNext
ठळक मुद्दे पास्ते ग्रामपंचायत : शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला ४ जागा

माजी सरपंच नवनाथ घुगे, शरद कुटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसिद्धेश्वर पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. ९ जागांसाठी सरळ लढत झाली. त्यात जयंत आव्हाड यांच्यासह सहकाऱ्यांच्या पॅनलने काठावर पास होत, सत्ता काबीज केली आहे. शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलमध्ये प्रवीण उगले (२५१), संगीता नाना आव्हाड (२३८), नवनाथ प्रकाश घुगे (१९८), वसंत महादू आव्हाड (१७४) या ४ उमेदवारांना मतदारांनी संधी दिली, तर अविनाश आव्हाड (१३३), गायत्री लालचंद आव्हाड (१५०), कांता रघुनाथ भगत (१५१), इंदुबाई शिवाजी आव्हाड (२१०), वनिता शरद हांडे (१३५) यांना साफ नाकारले. दरम्यान, विजयानंतर स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलच्या विजयी उमेदवारांसह नेते, कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला.
विजयी उमेदवारांना मिळालेली मते
स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलचे भाऊलाल घुगे (२३७), स्नेहल शरद आव्हाड (२१८), मनीषा प्रवीण भालेराव (२१६), मंदाबाई प्रकाश आव्हाड (२३३), मीराबाई अशोक पवार (१८६) यांच्या भाळी विजयाचा गुलाल लागला, तर सुमन कोंडाजी आव्हाड (१९८), नंदा रामदास घुगे (१२९), वैशाली ज्ञानेश्वर आव्हाड (१५२), शोभा नवनाथ आव्हाड (२०९) यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Late Munde panel at Paste past majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.