'Transformation' | खडांगळीत घडले ‘परिवर्तन’

खडांगळीत घडले ‘परिवर्तन’

ठळक मुद्दे सात जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज

सत्ता खेचून घेत ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात परिवर्तनच्या नेत्यांना यश आले. सतीश गोविंद कोकाटे, सतीश सोमनाथ कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, रवींद्र ठोक, शेखर कोकाटे यांच्या नेतृत्त्वात परिवर्तन, तर केशव कोकाटे, बजरंग कोकाटे, शांताराम कोकाटे, सोमनाथ कोकाटे यांच्या नेतृत्वात श्री स्वामी समर्थ पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. दरम्यान, विजयी उमेदवारांनी आमदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन गावाच्या विकासासाठी निधीची मागणी केली. कोकाटे यांनी विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी लक्ष्मण कोकाटे, सतीश कोकाटे, रवींद्र ठोक, सतीश कोकाटे, शेखर कोकाटे, अनिल ठोक, अमोल कोकाटे, रोहिदास ठोक, सचिन ठोक आदींसह विजयी उमेदवार उपस्थित होते. परिवर्तनमध्ये शरद कोकाटे (१८८), छाया ठोक (१७४), शीला कोकाटे (१८२), सागर कोकाटे (१७३), आशा ठोक (२०८), रंगनाथ कोकाटे (२२३) व कल्पना ठोक (१७५) उमेदवार विजयी झाले. श्री स्वामी समर्थ पॅनलच्या मधुकर कोकाटे (१५४), सिंधुबाई कोकाटे (१५३), सोनाली कोकाटे (१६५), प्रवीण कोकाटे (१४७), कांता ठोक (१२३), अरूण कोकाटे (१७९), वनीता ठोक (८१) यांना पराभव पत्करावा लागला. उज्ज्वला रवींद्र कोकाटे (१४६) यांनी अपक्ष उमेवारी केली. त्यांचाही पराभव झाला.

Web Title: 'Transformation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.