The price of maize in Umrane is Rs. 1,501 | उमराणेत मक्याला १,५०१ रुपये दर

उमराणेत मक्याला १,५०१ रुपये दर

ठळक मुद्दे बाजारभावात सुधारणा : बर्ड फ्लूच्या धास्तीतून उत्पादकांना दिलासा

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून इतर राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातल्याने त्याचा परिणाम राज्यातही काही ठिकाणी जाणवला होता. परिणामी, पोल्ट्री व्यवसाय धोक्यात येऊन मक्याला मागणी घटली होती. त्यामुळे मागील आठवड्यात येथील बाजार समितीत मका दरात घसरण होऊन कमीतकमी १,००० ते १,२५० रुपयांपर्यंत खाली आले होते. परिणामी, मका उत्पादक विक्रेत्यांना याचा फटका बसला होता, परंतु गेल्या दोन दिवसांपासून मका दरात पुन्हा सुधारणा होत दोनशे ते अडीचशे रुपयांची वाढ झाली असून, बाजारभाव कमीतकमी १,१५० रुपये, जास्तीतजास्त १,५०१ रुपये तर सरासरी १,३०० रुपयांपर्यंत विक्री झाला. २५८ वाहनांमधून सुमारे ६ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, बाजारभावात सुधारणा झाल्याने, बर्ड फ्लूच्या धास्तीतून मका उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
ऐन मका कापणीवेळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मका उत्पादनात घट आली असतानाच मागील आठवड्यात बर्ड फ्लूमुळे बाजारभाव खाली होते, परंतु गेल्या दोन दिवसांपासून बाजारभावात सुधारणा झाल्याने निदान मका उत्पादनासाठी केलेला खर्च तरी वसूल होणार आहे.
- भरत देवरे, शेतकरी

Web Title: The price of maize in Umrane is Rs. 1,501

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.