शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पगारे यांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:42 IST

‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला.

नाशिक : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला.विपश्यना विद्या प्रसारक समाज नाशिकचे अध्यक्ष अ‍ॅड. एम. एस. पगारे यांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली छायाचित्रे व बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन स्टार झोन मॉलमधील पु.ना. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्सच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रविणा दुसाने होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सक्तीदीदी, अ‍ॅड. एम.एस. पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रदर्शन दि. १३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत विनाशुल्क बघण्यासाठी खुले राहणार आहे.समाजात जे शिकायला मिळाले त्या अनुभवाचे संचित समाजाला दिले पाहिजे या भावनेने पुढील पिढीस दिशादर्शक ठरेल, असे प्रदर्शन भरविण्याचे काम अ‍ॅड. पगारे यांनी केल्याचे गौरवोद्गार यावेळी अग्रवाल यांनी काढले तर आपली ओळख आपला हुद्दा, पद नसून आत्मा आहे. आत्म्याला समजलो तर परमात्म्याला व संपूर्ण जगाला समजलो असे ब्रह्माकुमारी सक्तीदीदी यांनी यावेळी सांगितले. अ‍ॅड. पगारे यांनी निसर्ग हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरात आहे. भगवान बुद्धाची जीवन जगण्याची कला म्हणजे ‘धम्म’ असून ते आपल्याला समजले, आचरणात आणले तर जीवन सफल होईल. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, साधू-संत हे निसर्गाच्याच सान्निध्यात राहत होते. तेव्हा निसर्गापासून दूर जाऊ नका, असा संदेशही त्यांनी दिला.सूत्रसंचालन संतोष जोपूळकर यांनी केले. यावेळी पूजा गोसावी, सुशीला जोपूळकर, निर्मला पाटील, मीना वाघमारे, अ‍ॅड. प्रदीप गोसावी आदी उपस्थित होते.८० वर्षे वयाच्या अ‍ॅड. एम. एस. पगारे यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित निसर्ग व मानव संबंधावर आधारित छायाचित्रे तसेच सकारात्मक व दिशादर्शक बातम्यांची कात्रणे संकलित केली असून, त्याचेच प्रदर्शन भरविले आहे. निसर्गापासून लांब जाऊ नका, तर त्याचे संवर्धन करा, असा संदेश देण्यासाठी त्यांनी सदर प्रदर्शन भरविले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक