नाशिक : कोरोनाचे सावट यंदा जागतिक पर्यावरणदिनावर असल्यामुळे ‘देवराई’, ‘वनराई’ साकारण्याचा विडा उचलेलेल्या आपलं पर्यावरण संस्थेने सातपूरजवळील देवराईमध्ये नव्याने भारतीय प्रजातीच्या ८०० रोपांची लागवड मोजक्याच स्वयंसेवकांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.५) केली.नाशिक पश्चिम वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने यंदा कोरोना आजाराच्या प्रादूर्भावामुळे पर्यावरणदिनाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आटोपशीर घेण्यात आला. जलनगरीशेजारी असलेल्या नाशिक पश्चिम वनविभागाच्या राखीव वनात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत वनरक्षक व संस्थेचे स्वयंसेवकांनी ८३५ रोपांची लागवड पूर्ण केली. यावेळी वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, ओंकार देशपांडे, सचिन आहेर, नगरसेवक दिनकर पाटील, बांधकाम व्यावसयिक सुजीत जाजू, सरपंच दतू ढगे, संस्थेचे अध्यक्ष वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड आदि उपस्थित होते. दरम्यान, येथील पाच वर्षांपुर्वी लावण्यात आलेल्या वडाच्या झाडाला खतपाणी देऊन पर्यावरणपूरक पध्दतीने सन्मान देत रोपांच्या लागवडीला सुरूवात करण्यात आली.या रोपांची लागवडवड, कृष्णवड, आसाणा, काळा शिरीष, पांढरा खैर, बांबू, महारूख, मोई, हिवर, बाभूळ, हटरूण, पिंपळ, उंबर, करवंद, काटेपांगारा, पळस, काटेसावर आदी प्रजातीची रोपे लावण्यात आली.
आपलं पर्यावरण संस्था : ‘देवराई’मध्ये अजून ८३५ रोपांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 17:40 IST
गेल्या वर्षी पावसाळ्यात वनमहोत्सव साजरा करत संस्थेने या ठिकाणी २ हजार रोपांची लागवड केली होती. सध्या या देवराईमध्ये एकूण रोपांची संख्या १७ हजार झाली आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी लावलेल्या रोपांचे संवर्धन केले जात आहे.
आपलं पर्यावरण संस्था : ‘देवराई’मध्ये अजून ८३५ रोपांची भर
ठळक मुद्देछोटेखानी पर्यावरण दिन साजरा