शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात संघटनात्मक बदलाचे वेध

By admin | Updated: March 11, 2015 00:11 IST

शहराध्यक्षासाठी चुरस : मार्चअखेर सभासद नोंदणीसाठी इच्छुकांची धावपळ

नाशिक : विधानसभा निवडणुकीत शहरातील नाशिकरोड-देवळाली वगळता तीनही मतदारसंघांवर कब्जा करत वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या भाजपात आता संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले असून, शहराध्यक्षपदासाठी चुरस बघायला मिळणार आहे. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत अधिकाधिक सभासद नोंदणीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू असून, त्यानंतर वॉर्ड व मंडलनिहाय निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे.केंद्र आणि राज्यामध्ये भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्याने भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. भाजपात सध्या सभासद नोंदणीची मोहीम सुरू असून, मार्चनंतर वॉर्डप्रमुख व मंडलप्रमुखांच्या निवडणुकींचा कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी निवडणूक रंगणार आहे. नाशिक शहर भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्या चार वर्षांपासून लक्ष्मण सावजी यांच्या खांद्यावर आहे. २०१२ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष्मण सावजी यांच्या शहराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भाजपाने शिवसेनेशी असलेली युती तोडत ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. त्यात भाजपाने स्वबळावर १४ नगरसेवक निवडून आणले होते. विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेत शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत भाजपाचे तीन आमदार निवडून आले. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आल्याने साहजिकच भाजपात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता भाजपात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक बदलाचे वेध लागले असून, प्रामुख्याने शहराध्यक्षपदासाठी चुरस बघायला मिळणार आहे. विद्यमान शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या कारकिर्दीत भाजपाने लक्षणीय यश संपादन केले असले, तरी त्यांच्या एकाधिकारशाहीबाबतही पक्षांतर्गत असंतोषाचे स्फोट निवडणुकीच्या काळात बघायला मिळाले होते. लक्ष्मण सावजी यांनी दोन टर्म अध्यक्षपद भूषविले असल्याने आता भाजपात नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा यापूर्वी दीर्घकाळ शहराध्यक्षपद भूषविणारे विजय साने, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, संभाजी मोरुस्कर, उत्तम उगले, कैलास अहिरे, सुनील केदार, गोपाळ पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, इच्छुकांमधील काही पदाधिकारी हे प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी भूषवित असल्याने त्यांना शहराध्यक्षपदासाठी विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)