शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामसडक’ कामांचा अहवाल देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:12 IST

गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे केल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात ठेकेदारांनी ही कामे केलीच नसल्याचा आरोप करून याबाबत कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती झाली, त्याचा सविस्तर अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ग्रामसडक विभागाला दिले आहेत. 

ठळक मुद्देस्थायी समिती सभा : ग्रामीण भागात कामे न केल्याचा आरोप

नाशिक : गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे केल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात ठेकेदारांनी ही कामे केलीच नसल्याचा आरोप करून याबाबत कोणत्या रस्त्यांची दुरुस्ती झाली, त्याचा सविस्तर अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ग्रामसडक विभागाला दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ग्रामसडक योजनेचा आढावा घेताना भास्कर गावित, आत्माराम कुंभार्डे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, रस्त्याच्या साईडपट्ट्या उखडून अपघात होत आहेत, तसेच रस्त्याला जागोजागी खड्डे पडले असून, पावसाळा संपून अवघे काही महिने झाले असताना ही परिस्थिती झाली. आता पावसाळा चार महिन्यांवर येवून ठेपला असताना पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’, अशी परिस्थिती झाली आहे. यापूर्वीच्या सभेमध्ये या विषयावर चर्चा होऊन कार्यकारी अभियंत्यांना स्थायी समितीच्या सभेत उपस्थित राहण्याचा  ठराव करण्यात आलेला असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची बाब सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही नाराजी व्यक्त केली व यासंदर्भातील अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याचे आदेश ग्रामसडक विभागाला देण्यात आले.  सभागृहात अधिकारी वेगळी माहिती देतात; मात्र प्रत्यक्ष गाव पातळीवर वेगळी भूमिका वीज कंपनी वीज कंपनीच्या कारभारावरही टीकाया सभेत वीज कंपनीच्या कारभारावरही टीका करण्यात आली. ग्रामीण भागात अजूनही डी. पी. बदलण्यासाठी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करावी लागत असल्याचा आरोप गोतरणे यांनी केला. तर महेंद्रकुमार काले यांनी राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात वीज बिल वसुलीची सक्ती न करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या असतानाही वीज कंपनी वसुली करून वीज पुरवठा खंडित करीत असल्याची तक्रार केली. येवला तालुक्यातील मातुलठाण येथील डी.पी. बंद असून, वीस दिवसांपासून तेथील पाणी पुरवठा बंद असल्याचे सांगितले. यावर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ज्या गावात ८० टक्के वीज बिल वसुली झाली आहे, त्या गावांमध्ये अवघ्या ४८ तासात डी.पी. बदलून देण्यात येत असून, या सर्व कामांसाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वर्गणी गोळा करण्याची गरज नसल्याचे सांगितले. घेत असल्याची तक्रार करण्यात आली. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदPresidentराष्ट्राध्यक्ष