गौतमनगरमधील रस्ता तोडफोडीच्या चौकशीचे आदेश

By Admin | Updated: April 8, 2017 23:31 IST2017-04-08T23:30:48+5:302017-04-08T23:31:02+5:30

चांदवड : तळेगाव-रोही येथील रस्त्याच्या बेकायदेशीर तोडफोड प्रकरणी उपसरपंच बाबाजी वाकचौरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुष्पा पांडे यांनी दिले आहेत.

Order of inquiry into road mishap in Gautamnagar | गौतमनगरमधील रस्ता तोडफोडीच्या चौकशीचे आदेश

गौतमनगरमधील रस्ता तोडफोडीच्या चौकशीचे आदेश

 चांदवड : तालुक्यातील तळेगाव-रोही येथील गौतमनगर रस्त्याच्या बेकायदेशीर तोडफोड प्रकरणी उपसरपंच बाबाजी वाकचौरे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश चांदवड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पुष्पा पांडे यांनी दिले आहेत.
याबाबत तळेगावरोहीच्या ग्रामपंचायत सदस्य सुशीला वेडूजी केदारे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि. ५ मार्च रोजी तक्रार अर्ज केला होता. याबाबतचे वृत्त ‘लोेकमत’ने दि. १० मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत संबंधित उपसरपंच बाबाजी वाकचौरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पंचायत समितीने तळेगावरोहीचे सरपंच व ग्रामसेवक यांना दिले असून, केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत सदस्य सुशीला केदारे यांना द्यावा, असे आदेशात म्हटले आहे. तळेगावरोही येथील रस्त्यावरील पाणी मोरीची तोडफोड करण्यात आली. पदाचा गैरवापर करून उपसरपंच यांनी बेकायदेशीरपणे रस्ता तोडणे, रस्त्यावरील
झाडे तोडणे तसेच बेकायदेशीर पद्धतीने खासदार निधीमधील पाणी मोरी बांधलेली असताना ती तोडणे, तर बेकायदेशीर पद्धतीने
परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील गवतास आग लावणे आदि कृत्य केल्याने या प्रकाराची चौकशी करावी,
अशी मागणी सुशीला केदारे यांनी वरिष्ठांकडे आॅनलाइन अर्जाने केली होती. त्यांच्यावर कारवाईचे आदेश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Order of inquiry into road mishap in Gautamnagar