शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

By admin | Updated: August 23, 2015 00:22 IST

येवला : शासकीय अधिकार्‍यांची पाहणी

येवला : तालुक्यातील ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी धुळगाव परिसरातील शेतकरी प्रवीण बाळासाहेब सोनवणे यांनी एअर व्हॉल्व्ह खोलून हजारो लिटर पाणीचोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.पाणीपुरवठा कर्मचारी विठ्ठल घुले यांच्या निदर्शनास सदर घटना येताच  त्यांनी वरिष्ठांना कळविताच तासाभरात तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, प्रभारी सभापती जयश्री बावचे, ३८ गाव पाणीपुरवठा अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, सचिव डी.जी. सपकाळे, श्याम बावचे, उत्तम घुले, ए.एस. बागुल यांच्यासह पंचायत समिती अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पहाताच सोनवणे कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. पाणीचोरीबाबतचे सत्य काय आहे ही माहिती तहसीलदारांसह पदाधिकार्‍यांनी घेतली. या बाबत खात्नी पटल्याने संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. ३८ गाव योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्र बाभूळगाव येथील साठवण तलावातून गेल्या दोन दिवसापूर्वी मध्यरात्नीच्या सुमारास शेतकरी तलावात मोटार टाकून पाणी घेण्याच्या उद्देशाने आले. परंतु कर्मचारी उत्तम घुले यांनी जागरूकतेने कर्तव्य केले. ही बाब त्यांनी वरिष्ठांना फोनवरून सांगितली.त्यामुळे पाणीचोरीचा प्रयत्न अपयशी ठरला.  पाणीचोरीचा असा प्रकार पुन्हा आढळला तर गुन्हा दाखल करावा असा आदेश कर्मचारी वर्गाला देण्यात आला. पाणीचोरी होऊ नये म्हणून पोलिसांना रात्नीची गस्त या परिसरात घालण्यास सांगण्यात आले आहे.  (वार्ताहर)