शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

श्लोक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

By admin | Updated: September 21, 2014 00:57 IST

श्लोक कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

 

नाशिक : विविध विषयांना हात घालणाऱ्या आकर्षक चित्रांबरोबर शिल्पांना एकाच छताखाली आणत रसिकांना मेजवानी देणाऱ्या श्लोक प्रदर्शनाचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बॅँक आॅफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजन लोंढे, उद्योजक हेमंत राठी, कथ्थक नर्तक मयूर वैद्य, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, त्रिशा रेअर क्राफ्टचे संचालक हर्षल नाईक, अनिल चौघुले, शैलेश कुटे, पंडित सोनवणी, आनंद सोनार, प्रसाद पवार, प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, राजा पाटेकर आदि उपस्थित होते. लोकमतच्या वतीने राज्यातील अनेक ठिकाणी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून कलावंतांना पुढे आणण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले असून, नाशिकमधील कलावंतांना प्रोत्साहन देणारा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार नीलिमाताई पवार यांनी काढले. उद्योजक हेमंत राठी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत कलावंतांना चांगले व्यासपीठ दिल्याचे उद्गार काढले. कथ्थक नर्तक मयूर वैद्य यांनी चित्रांमधून जास्त भावना व्यक्त होत असल्याचे सांगत लोकमतच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना भेट देत असताना वेगळाच अनुभव येतो, असे सांगितले.लोकमत आणि त्रिशा रेअर क्राफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाप्रदर्शनासाठी स्थानिक कलाकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नाशिक परिसरामधून दीडशेहून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. त्यापैकी निवडक ३५ कलाकृतींना या प्रदर्शनात स्थान मिळाले आहे.उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नाशिककर रसिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्यात गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मालतीबाई कुलकर्णी विद्यालयातील विद्यार्थिनींसमवेत मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे, विनिता पवार, प्रीतेश गावित, प्रशांत अहिरे उपस्थित होते. त्रिशा हॉल, त्रिशा रेअर क्राफ्ट, बॉस्को सेंटर, प्रसाद सर्कलजवळ, गंगापूररोड येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व रसिकांसाठी ते खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला नाशिककर रसिकांनी भेट द्यावी आणि या कलाकृतींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविक, तर वितरण विभागाचे पंकेश चंद्रात्रे यंनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)