महिलेची छेड काढणाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST2021-03-08T04:14:55+5:302021-03-08T04:14:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : देवळाली कॅम्प परिसरात भाटिया कॉलेज बस स्टॉपमागे उभ्या असलेल्या महिलेची छेड काढीत मनात ...

On the one who pierced the woman | महिलेची छेड काढणाऱ्यावर

महिलेची छेड काढणाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : देवळाली कॅम्प परिसरात भाटिया कॉलेज बस स्टॉपमागे उभ्या असलेल्या महिलेची छेड काढीत मनात लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दात बोलणाऱ्या नवीन स्टेशन वाडीतील तरुणाविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश सुनील जाधव (रा. नवीन स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिला शनिवारी (दि. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास भाटिया कॉलेज बस स्टॉपमागे मैत्रिणीसोबत बोलत होती त्यावेळी संशयित योगेश जाधव याने खडे मारून तिची छेड काढली. त्यामुळे पीडितेने विचारणा केली असता संशयिताने शिवीगाळ व मनात लज्जा उत्पन्न होईल, असे अक्षेपार्ह वक्तव्य केल्याची तक्रार पीडितेने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: On the one who pierced the woman