शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
2
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
3
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
4
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
5
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
6
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
7
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
8
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
9
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
10
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
11
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
12
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
13
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
15
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
16
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
17
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
18
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
19
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
20
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक रेल्वेतून उत्तर प्रदेशला एक हजार ३२ मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:44 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गोरखपूरला शहरासह जिल्हाभरातील १ हजार ३२ मजूर कामगारांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली.

ठळक मुद्देप्रवाशांना मोफत अल्पोपहार : खाद्यपदार्थांचे कॅन्टिंग उघडले

नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकातून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील गोरखपूरला शहरासह जिल्हाभरातील १ हजार ३२ मजूर कामगारांना घेऊन श्रमिक रेल्वे रवाना झाली.जिल्हा प्रशासनाकडे नोंद केलेल्या लहान मुलांसह एक हजार ३२ मजूर कामगार नाशिकरोड रेल्वेस्थानकातून उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे श्रमिक रेल्वेने रवाना झाले. या गाडीत भुसावळहून ३६५ प्रवासी बसले. त्यात जळगाव जिल्ह्यातील १५५, तर नंदुरबार जिल्ह्यातील २१० प्रवासी होते. या गाडीसाठी एकूण १३६५ तिकिटांची विक्री झाली असून, तिकिटाचा दर प्रत्येकी ६७० रुपये होता. नाशिक, सिन्नर, कळवण, सटाणा, त्र्यंबके श्वर आदी तालुक्यातून परप्रांतीयांना नाशिकरोड स्थानकात आणण्यात आले. गाडीत बसण्यापूर्वी त्यांना पुरी, भाजी, पुलाव व पाण्याच्या दोन बाटल्या सोबत देण्यात आल्या. यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही मदत केली. नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे पोलीस निरीक्षक अशोक जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक रेल्वे रवाना झाली. जिल्हा व महापालिका प्रशासनाचेही प्रतिनिधी उपस्थित होते.एक तासात होते जेवण तयारमुंबईहून एकूण १४० रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. काही गाड्या नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबत असून, या प्रवाशांना रेल्वेतर्फे मोफत नाश्ता तसेच अन्नाची पाकिटे दिली जात आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबणार असल्याचा मेसेज येताच एक तासात जेवण तयार करण्यात येत आहे. स्थानकातील खाद्यपदार्थाचे कॅन्टिंग उघडण्यात आले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे