सिन्नरजवळ तिहेरी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:59 IST2018-09-07T23:11:13+5:302018-09-08T00:59:32+5:30
सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावर शहराजवळ झालेल्या तिहेरी अपघातात पीकअप जीपचालक ठार झाला, तर अन्य तीघेजण जखमी झाले. शहराजवळील हॉटेल ऋतुरंग पार्कजवळ गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात घडला.

सिन्नरजवळ तिहेरी अपघातात एक ठार
सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावर शहराजवळ झालेल्या तिहेरी अपघातात पीकअप जीपचालक ठार झाला, तर अन्य तीघेजण जखमी झाले. शहराजवळील हॉटेल ऋतुरंग पार्कजवळ गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात घडला.
सटाणा तालुक्यातील ताहराबाद येथून दोन पीकअप जीप कोथंबिर घेऊन पुणे येथे जात होत्या. सिन्नर शहर ओलांडल्यानंतर समोरुन संगमनेरकडून सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या मालट्रक (क्र. एमएच १७ टी. ७४०६) ने सिन्नरकडून संगमनेरच्या दिशेने जाणाºया बोलेरो पीकअप जीप (क्र. एमएच ४१ एजी ६११) ला जोरदार धडक दिली. त्यानंतर पाठीमागून येणाºया मॅक्स पीकअप जीप (क्र. एम. एच. ४१ जी ३१०४) ला धडक बसली.
या तिहेरी अपघातात पीकअप जीपचालक कुणाल भिका जाधव (२२) हा ठार झाला. तर दुसरा पिकअप जीपचालक राजेंद्र साहेबराव सोनवणे रा. उंबरी ता. साक्री (धुळे), यशवंत नथू खैरनार (रा. ताहराबाद ता. सटाणा) व मालट्रक चालक माधव आबाजी सातपुते रा. सुकेवाडी ता. संगमनेर हे तिघे जखमी झाले.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.