मोहदरी घाटात अपघातात एक ठार

By Admin | Updated: March 30, 2017 23:49 IST2017-03-30T23:48:51+5:302017-03-30T23:49:06+5:30

सिन्नर : नाशिक - पुणे मार्गावर मोहदरी घाटात मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झापवाडी येथील एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

One killed in an accident in Mohdari Ghat | मोहदरी घाटात अपघातात एक ठार

मोहदरी घाटात अपघातात एक ठार


सिन्नर : नाशिक - पुणे मार्गावर मोहदरी घाटात मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झापवाडी येथील एकजण जागीच ठार झाल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. झापवाडी येथील मारुती मनीराम नवाळे (५०) हे अमृता विजय मोरे (१७) हिच्यासह मोटारसायकलने (एमएच १५ ईडी ९८८३) नाशिकहून सिन्नरकडे येत होते. ते मोहदरी घाटात आले असता समोरून आलेल्या मालवाहू ट्रकने (एमएच १२, ओटी ४२९९) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात नवाळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अमृता ही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One killed in an accident in Mohdari Ghat