शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटातील अपघातात एक ठार

By admin | Updated: July 3, 2016 23:56 IST

कसारा घाटातील अपघातात एक ठार

 इगतपुरी : कसारा घाटात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे निसर्ग बहरला असून मुंबई, नाशिककडून येणारे, जाणारे प्रवासी वाहने थांबवून सेल्फी घेतात. अशाच निसर्गाचे फोटो घेण्यासाठी दुपारी एकच्या दरम्यान स्विफ्ट गाडी क्र मांक एम. एच. १५ बी. सी. ७३१६ ही महामार्गालगत घाटात थांबलेली असताना याच दिशेने मारुती वॅगनर गाडी क्र मांक एम. एच. २० डी. सी. ११०४ ही ओव्हरटेक करत असताना मागून येणारा कंटेनर क्र मांक एम. एच. १५ डी. जे. १११६ चालकाचा ताबा सुटल्याने उभ्या गाडीला जोरदार धडक दिली. यात वॅगनरमधील सुनील एकनाथ पाटील ( ५० ) , राहणार घाटी जिल्हा परभणी हे जागीच ठार झाले, तर वंदना सुनील पाटील (४७), मयूर सुनील पाटील (२४), प्रणाली सुनील पाटील (१८) सर्व राहणार घाटी जिल्हा परभणी हे जखमी झाले आहेत. उभ्या असलेल्या स्विफ्ट गाडीतील रवि रोसलाणी (३९), समनर रोसलाणी (३५), लक्ष्मी आडवाणी (५०), धीरज रोसलाणी (१०), गुंजन रोसलाणी (११) व चालक सागर (पूर्ण नाव समजले नाही ) सर्व राहणार नाशिक हे जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कसारा पोलिसांनी दिली. या अपघातातील जखमींना घटनास्थळी गॅमन इंडिया एक्स्प्रेस वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीची मदत करून उपचाराकरिता रुग्णालयात पाठविले. अपघातातील सर्व जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असून अधिक तपास कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे करीत आहे. (वार्ताहर)