दीड वर्षानंतर बेपत्ता मुलीचा शोध

By Admin | Updated: September 27, 2015 00:11 IST2015-09-27T00:11:19+5:302015-09-27T00:11:34+5:30

दीड वर्षानंतर बेपत्ता मुलीचा शोध

One-and-a-half years after the discovery of the missing girl | दीड वर्षानंतर बेपत्ता मुलीचा शोध

दीड वर्षानंतर बेपत्ता मुलीचा शोध

नाशिक : मखमलाबाद परिसरातून सुमारे दीड वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यास पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेला यश आले आहे़ या मुलीचे अपहरण नव्हे, तर स्वखुशीने ती या युवकासोबत गेल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, हे दोघे पंढरपूर येथील कापड दुकानात कामास होते़
मखमलाबाद परिसरात राहणारी ही शालेय मुलगी ३० मे २०१४ रोजी बेपत्ता झाली होती़ शेजारी राहणाऱ्या युवकानेच तिला फूस लाऊन पळवून नेल्याचे तिच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते़ तसेच पोलीस तपास न करता दमदाटी करीत असल्याचे निवेदन पालकांनी दिले होते़
यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्याकडे सोपविण्यात आली होती़ तांत्रिक शाखेची मदत व गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक गिरमे, सहायक निरीक्षक पाठक, पोलीस हवालदार सदावर्ते यांच्यासह ही टीम पंढरपूरला पोहोचली़ तेथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने २३ सप्टेंबरला एका कापड दुकानात या युवक व मुलीला शोधून ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)

Web Title: One-and-a-half years after the discovery of the missing girl