शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा दीड रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:58 IST

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.

पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे.दिंडोरी तालुक्यात नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टमाटा पिकाला उतरती कळा लागली असून निर्यातक्षम टमाटा चार रु पया ते सहा रूपये किलो भावापर्यंत घसरला आहे. लाल व गारशेल (कवडी फुटलेला ) टमाटा प्रती किलो दिड ते दोन रु पये व प्रति कॅरेट तिस ते ऐंशी रु पये एवढा भाव मिळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .दिंडोरी तालुक्यात टमाटापिकाची लागवड पांडव पंचमीला पिकाची मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी टमाटा लागवडीच्या वेळीच परतीच्या पावसामुळे रोपे खराब झाली. त्यानंतर बळीराजाने एक रु पये तिस पैसे प्रमाणे एका टमाटा रोपाच्या काडीला मोजून टमाटा लागवड केली . लागवड केलेला टमाटा सतत कोसळणाºया पावसामुळे खराब झाला. काही भागातील टमाटा वाचविण्यासाठी बळीराजाला अतोनात मेहनत करावी लागली . पावसाने उघडीप दिल्याानंतर औषधांची फवारणी , धुरळणी करून एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला .टमाटा मार्केटला गेल्यानंतर आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात प्रति कॅरेट (विस किलो ) सातशे ते आठशे रु पये बाजार मिळत होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात १०० पासून ते ३०० रूपयांपर्यंत टमाटा व्यापारी खरेदी करायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाला अमोनिया , सम्राट या सारखी महागडी खते वापरून खराब झालेल्या टमाट्याला जीवदान दिले. परंतु डिसेंबर महिन्यात प्रारंभीच टमाट्याला दिड ते दोन रु पये किलो भाव मिळू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक