शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

वनविभागाच्या रोपवाटिकांमधील दीड लाख रोपांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 5:01 PM

काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या पुरात वाहुन गेल्या.

ठळक मुद्देपाणी ओसरल्यानंतर चित्र स्पष्ट

नाशिक : वीस दिवसांपुर्वी शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ४५ हजार क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. यामुळे दुपारी बारा वाजेपासून गोदावरीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. या महापूराचा फटका गंगापूर-गोवर्धन शिवारात असलेल्या वनविभागा पश्चिम नाशिकच्या रोपवाटिकेसह सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटिकेला बसला. गंगाकाठ रोपवाटिका पुर्णपणे पाण्यात बुडाल्याचे चित्र होते कारण येथील पूलावरून महापूराचे पाणी वाहत होते. या दोन रोपवाटिकांमधील सुमारे दीड लाख रोपांचे नुकसान झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

गोदावरीला आलेल्या महापुरामुळे सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटीका तसेच पश्चिम वनविभाग गंगापुर रोपवाटीकेमधील १४० प्रजातीच्या जवळपास १ लाख ३५ हजार रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरापुर्वी सामाजिक वनीकरणाच्या गंगाकाठ रोपवाटीकेत ३ लाख ६५ हजार रोपे, गंगापुर रापवाटीकेत ३ लाख ५ हजार रोपांचे संगोपन करण्यात आले होते. महापुरानंतर यामधील निम्या रोपांना पुराचा मोठा फटका बसला. यातील काही रोपांना वाचविण्यात यश आले. सुमारे दीड लाख रोपे सडल्यामुळे त्यांना फेकुन देण्याची वेळ दोन्ही रोपवाटीकांना आली आहे. महापुरामुळे या रोपवाटींकाची दयनीय अवस्था बघावयास मिळत आहे. यामधील अनेक रोपे पाण्याने सडली आहेत तर काही रोपे ही पाण्याने वाहुन आलेल्या गाळाखाली दबली गेली आहेत. ही रोपे काढण्यासाठी वनमजुरांकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्या रोपांची अवस्था बिकट झाली आहे, ती रोपे फे कून देण्याशिवाय पर्याय नाही. गंगाकाट रोपवाटीकेमधील ५ हजार लिटरच्या ५ पाण्याच्या टाक्या पुरात वाहुन गेल्या.----

३३कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी  रोपे रोपवाटीकांमध्ये आंबा, आवळा, हिरडा, रिठा, अशोका, महारूख, रूद्राक्ष, कदम, उंबर, बेल, पेरू, कैलासपती, जास्वंद, शिलारोप, बांबु, खाया, कतरजिव, चिंच, वड, पिंपळ, जांभुळ, सिताफळ यांसारख्या विविध प्रजांतीच्या रोपांचे संगोपन करण्यात येते. त्यानंतर योग्य वाढ झालेली रोपे दरी-मातोरी, शिलापुर, मुंगसारे, ओढा, पिंपळगाव, तळेगाव, वाढोची या भागांमधील ग्रामपंचायतींना ३३कोटी वृक्ष लागवड अभियानासाठी पुरविली जाणार आहे. ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण करावयाचे आहे. अद्याप टार्गेट ९५ टक्क्यांपर्यंत आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागgodavariगोदावरीNashik Floodनाशिक पूर