शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जुन्यांनी फसविले; नव्यांना वेळ द्या

By admin | Updated: January 6, 2015 00:47 IST

धनगर समाज आरक्षण : मान्यवरांच्या प्रतिक्रया ; ६५ वर्षांत हाती काहीच नाही

नितीन काळेल - सातारा -धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, ही आमची ठाम भूमिका व मागणी आहे. त्यासाठी मागीलवर्षी आंदोलनही केले. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले. भाजपच्या नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. पंधरा दिवसांत आरक्षणाचा निर्णय होणार नाही. काँग्रेसने ६५ वर्षे काही न करता समाजाला फसविण्याचे काम केले, असा ठाम आरोप धनगर समाजातील मान्यवरांनी केला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत महाधिवक्त्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली आहे. या पर्श्वभूमीवर धनगर समाजातील काही मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजप व मित्रपक्षांच्या दोन्ही नवीन शासनाला थोडासा वेळ द्यावा लागेल, त्यांनी निर्णय न घेतल्यास पुढील भूमिका ठरवू, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ‘६५ वर्षांत काँग्रेसच्या शासनाने आम्हाला काही दिले नाही. बारामतीत उपोषण करूनही काही पदरी पडले नाही. केंद्रात व राज्यात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. हे सरकार आम्हाला नक्कीच आरक्षण देईल. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राजकारण करायचे आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मंत्री असतानाही या प्रश्नावर एकाच जातीची बाजू घेतली, हे दुर्दैव आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात काहीच अडचण नाही.’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष टी.आर. गारळे म्हणाले, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणाच्या निर्णयासंबंधी १५ दिवसांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत वाट पाहावी लागेल. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. पुढे काय निर्णय घ्यायचा ते सर्व आमची कृती समितीच ठरवेल.’ साताऱ्यातील अहिल्या सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मारुती जानकर यांनी आक्रमकतेवर भर देत सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा व आपला शब्द पाळावा. नाहीतर भाजपचीही राष्ट्रवादीसारखी स्थिती करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही.’ रयत शिक्षण संस्थेच आजीव सदस्य आनंदराव डोंबाळे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असे ठामपणे सांगितले. ते म्हणाले, ‘आरक्षणाबाबत लवकर निर्णय न झाल्यास साखळी आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. आम्ही आरक्षणाच्या निकषात बसत आहे. त्यामुळे आरक्षण हे आम्हाला मिळायलाच हवे,’ असेही त्यांनी निक्षून सांगितले. (प्रतिनिधी)सर्व समाज एकत्र...धनगर समाजाला एनटीच्या सवलतीचा फायदा होत नाही. आम्ही अनुसूचित जमातीचे आरक्षण मागत आहोत. धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी समाजातील सर्व घटक व सर्व पोटाजाती एकत्र आल्या आहेत. राजकीय नेतेही एकत्र आले आहेत. त्यामुळे शासनाला आता आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवता येणार नाही, असेही मान्यवरांनी सांगितले.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत भांडणे लावण्याचे काम केले. धनगर समाजाला आरक्षण देणे हा राजकीय नाहीतर भावनिक मुद्दा आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुकूल भूमिका आहे.- महादेव जानकर, अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष