देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

By Admin | Updated: September 29, 2016 00:51 IST2016-09-29T00:51:11+5:302016-09-29T00:51:40+5:30

देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

Offering tributes to the martyr soldiers at Devlalikamp | देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

भगूर : देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना कॅण्डल मूकफेरी काढून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
भगूर जवळील देवळाली कॅम्प हद्दीतील प्रभाग आठमधील विविध सोसायटीमधील सर्व नागरिकांनी नगरसेवक आशा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली मेणबत्ती घेऊन विजयनगर भागात मूकफेरी काढली. यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, पोलीस हवालदार शहाजी भोर, प्रमोद काळे, दिनकरराव आगोणे, त्रंबक मेढे, भीमराव मोरे, कारभारी बच्छाव, रमन पगार, श्रीकांत गायकवाड, विजय नायडु, अमोल जाधव, सुनील गायकवाड, आडके, बोराडे, महाले, संतोष देशमुख, प्रशांत कापसे,
रमेश डमाळे, प्रशांत बच्छाव, आशिष गावडे, सनी पवार, रोहित तुपे, वैभव काळे, निशांत बेरड, आवेश शेख, सावित्रीबाई डमाळे, शेलार आजी, कांचन मेढे, सौ. मोरे, सौ. आडके आदिंसह परिसरातील आजी-माजी सैनिक सहभागी झाले होते.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या आणि देशभक्त शहीदांच्या जीवनावर प्रेस कामगार नेते प्रशांत कापसे, माजी नगरसेवक तानाजी करंजकर, प्रशांत बच्छाव, अमोल जाधव आदिंची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Offering tributes to the martyr soldiers at Devlalikamp