शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 1:29 AM

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र नामदेव जाधव (५७) यांच्याविरुद्ध ज्ञात स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ४६ लाख ८२ हजार इतकी अधिक अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र नामदेव जाधव (५७) यांच्याविरुद्ध ज्ञात स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ४६ लाख ८२ हजार इतकी अधिक अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाधव यांच्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड आणि नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घरांचे झडती घेण्याचे काम सुरू केले आहे.  पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर कारवाई केली आहे. पुणे युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रेय भापकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.चांदवड, श्रीरामपूरला झडतीनाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याविरुद्ध अपसंपदाप्रकरणी दाखल झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराची तसेच नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घराची झडती घेण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केले आहे. चांदवड येथील घराची झडती घेण्यासाठी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पोहोचले असता, घर बंद स्थितीत आढळून आले. त्यामुळे पथकाने घराला सील ठोकले असून त्याठिकाणी स्थानिक पोलिसांचा पहारा लावला आहे. दरम्यान, येत्या ३१ जानेवारीला जाधव हे सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी आठ दिवस अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढवली आहे.रामचंद्र जाधव हे पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रमुखपदी कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध अपसंपदा प्रकरणी तक्रार दाखल झालेली होती. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने चौकशी सुरू केली.विभागाने १५ जून १९८५ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जमविलेल्या संपत्तीची माहिती घेतली. मालमत्तेच्या उघड चौकशी दरम्यान जाधव यांच्या सेवेतील कालावधीत ज्ञात स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा जादा उत्पन्न आढळले.चौकशीत ४६ लाख ८२ हजार ४०३ रुपये इतकी अधिक म्हणजे २३.५३ टक्के अधिक अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी केली. जाधव यांनी ४६ लाखांहून अधिक अपसंपदा संपादन केल्याने पुणे चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक