जहॉँगिर मशिदीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: January 15, 2017 01:00 IST2017-01-15T01:00:01+5:302017-01-15T01:00:15+5:30

न्यायालयाचा आदेश : आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार

Offense against office bearers of Jahangir mosque | जहॉँगिर मशिदीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

जहॉँगिर मशिदीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

 नाशिक : जुन्या नाशकातील जहॉँगिर मशीद व कब्रस्तान वक्फ मंडळाच्या कारभाराची दखल घेत न्यायालयाच्या आदेशान्वये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात आजम बाबू शेख यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या या वक्फचा कारभार करताना कार्यकारी मंडळाने सर्व कायदे धाब्यावर बसविले तसेच मंडळाच्या बैठका व निवडणुका घेणे, त्याचबरोबर वक्फची जागा मनपाला देणे, जनाजा हॉल बांधणे यासाठी मंडळाची परवानगी नसताना मिळकत हस्तांतरण करणे, अकरा लाख रुपयांचा अपहार, एक कोटी ४४ लाखाचा हिशेब न देणे, मशिदीच्या जागेवर अतिक्रमणाला प्रोत्साहन देणे, वक्फ बोर्डाची परवानगी न घेता १८ लाखांचे बांधकाम करणे आदि बाबींसाठी मिर मुख्तार अशरफी, खतीब अन्वर मोहमद साब, हसीनखान उमरखान, हैदरखान अमीर खान, सय्यद अख्तरअली, खतीब फैसल नवाज गुलाम गौस व सय्यद अकील बने मियॉ यांच्याविरुद्ध आजम बाबू शेख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कलम २०२ अन्वये भद्रकाली पोलिसांना चौकशीचे आदेश दिले असता त्यानुसार चौकशी करण्यात आली, त्यात साक्षीदार, फिर्यादी व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले व अहवाल सादर करण्यात आला.

Web Title: Offense against office bearers of Jahangir mosque