बाधित संख्या २ हजारांखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:27 IST2021-05-15T01:27:18+5:302021-05-15T01:27:38+5:30

जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येत सलग चौथ्या दिवशी घट आली असून शुक्रवारी (दि. १४) १८८७ नवीन बाधित आढळले. २०५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ३६ बळींची नोंद झाल्याने बळींची संख्या ४०४० वर पोहोचली आहे. 

Obstructed number below 2 thousand | बाधित संख्या २ हजारांखाली

बाधित संख्या २ हजारांखाली

नाशिक : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येत सलग चौथ्या दिवशी घट आली असून शुक्रवारी (दि. १४) १८८७ नवीन बाधित आढळले. २०५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ३६ बळींची नोंद झाल्याने बळींची संख्या ४०४० वर पोहोचली आहे. 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी २० तर नाशिक मनपा क्षेत्रात १३ तर मालेगाव मनपा क्षेत्रात ३ जणांचा बळी असे ३६ बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ४०४० वर पोहाेचली आहे. जिल्ह्यातील १८८७ बाधितांपैकी ९६५ नाशिक मनपा, ९१५ नाशिक ग्रामीण तर मालेगाव मनपा क्षेत्रातील ७ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या ४५४२ वर गेली आहे. 

Web Title: Obstructed number below 2 thousand