शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात मंडळांची संख्या घटली

By admin | Updated: September 6, 2016 01:07 IST

पाथर्डी फाटा परिसर : पोलिसांच्या कारवाईची कार्यकर्त्यांना भीती

पाथर्डी फाटा : परिसरात यावर्षी पोलिसांच्या ताठर आणि कठोर भूमिकेमुळे गणेशोत्सवात मंडळांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत असून, गल्ली-बोळातली लहान- मोठी मंडळे कारवाईच्या धास्तीने गायब झाल्याचे चित्र आहे. याचा गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासारखा चांगला परिणाम होणार असला तरी अनेक लहान मुलांची छोटी-छोटी मंडळे आणि काही कार्यकर्ते एकत्र येऊन एखादा उत्सव साजरा करताना पोलिसी कारवाईच्या भीतीने नाराज झाल्याचे समोर आले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर साजरा होणारा गणेशोत्सव खरे तर अधिक उत्साहात, धामधुमीत व मंडळांच्या संख्येत वाढ होऊन साजरा होईल, असे सामान्य नागरिकांना वाटत होते. काहींनी तशी तयारीही सुरू केली होती. मात्र उत्साहापूर्वी ठिकठिकाणी पोलिसांनी घेतलेल्या बैठका, त्यात मांडलेली भूमिका आणि त्यांच्या माध्यमांमधून आलेले वृत्त याचा अर्थ लावताना आपल्यावरही एखाद्या नजरचुकीने झालेल्या चुकीमुळे पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल की काय ? या धास्तीने अनेकांनी या भानगडीत पडण्याचे टाळले आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा धाक आवश्यक असला तरी त्याचा अतिरेक होणे ही बाब चांगली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र ऐकायला मिळत आहे. रोज माध्यमांमधून जाहीर होणारी पोलिसांची नियमावली गणेशोत्सवासाठी कटकटीची असल्याच्या प्रतिक्रि या व्यक्त केल्या जात आहेत.या नियमावली व त्यांच्या अंमलबजावणीविषयी गणेश मंडळांचे व इतर छोट्या-छोट्या ग्रुप्सचे कार्यकर्ते जाणकारांकडे व माध्यम प्रतिनिधींकडे चौकशी करताना दिसून येतात. परिणामी प्रामाणिकपणे व शांततेत उत्सव साजरे करू इच्छिणाऱ्यांचा उत्साह व तयारीला पोलिसांच्या सध्याच्या अति ताठर भूमिकेमुळे ब्रेक लागल्याचे वातावरण प्रभाग क्र . ५२ मध्ये पहायला मिळत आहे. जी मंडळे उपद्रवी आहेत किंवा ज्यांच्याविषयी तक्र ारी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावीच मात्र कायद्याच्या अतिरेकी धाकात सोसायट्या, गल्ल्यांमधील मुलं, महिलांच्या छोट्या-छोट्या उत्सवाला असा प्रतिबंध करणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.