शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

आता सत्तापदांचे वेध

By admin | Updated: February 26, 2017 00:21 IST

कोण होणार महापौर? : महत्त्वाच्या पदांसाठी भाजपात चुरस

नाशिक : महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवित घवघवीत यश संपादन करणाऱ्या भाजपातील नवनिर्वाचित नगरसेवकांना आता सत्तापदांचे वेध लागले आहेत. १५ मार्चपूर्वी महापौर विराजमान होणे आवश्यक असल्याने भाजपातील पाच इच्छुकांपैकी पक्षश्रेष्ठी कुणाच्या पदरात महापौरपद टाकतात, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, उपमहापौरांसह स्थायी समिती, शिक्षण समिती या महत्त्वाच्या पदांसाठी पक्षात चुरस दिसून येत आहे.  महापालिकेत भाजपाने ६६ जागा संपादन करत पूर्ण बहुमत प्राप्त केले, तर ३५ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला आता प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांची नोंद अधिकृतपणे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर १५ मार्चपूर्वी महापौरपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून, भाजपाकडून या गटात ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी, पुंडलिक खोडे, सुरेश खेताडे, प्रा. सरिता सोनवणे व रूपाली निकुळे हे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये सलग पाचव्यांदा निवडून आलेल्या रंजना भानसी या प्रबळ दावेदार आहेत. पुंडलिक खोडे यांनी यापूर्वी नगरसेवकपद भूषविले असले तरी काहीकाळ ते सक्रिय नव्हते, तर सुरेश खेताडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेला आहे. रूपाली निकुळे यांनीही निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला आहे. सरिता सोनवणे या पहिल्यांदाच महापालिकेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या खुर्चीसाठी रंजना भानसी यांची निवड निश्चित मानली जात आहे.