सव्वादोनशे उद्योगांना नोटिसा

By Admin | Updated: September 21, 2014 00:58 IST2014-09-20T20:22:51+5:302014-09-21T00:58:10+5:30

सव्वादोनशे उद्योगांना नोटिसा

Notices to Savvansonesh Industries | सव्वादोनशे उद्योगांना नोटिसा

सव्वादोनशे उद्योगांना नोटिसा


नाशिक : सातपूर आणि अंबड औद्योगिक क्षेत्रातील सुमारे सव्वादोनशे कारखान्यांना वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी दंडात्मक नोटिसा महापालिकेच्या वतीने बजावण्यात येणार आहेत. सदरच्या उद्योगांनी शेड उभारणीच्या परवानगी असल्याचे पालिकेला सांगितले होते; परंतु दोन महिने झाले तरी केवळ आठ ते दहा उद्योजकांनीच अशा प्रकारची परवानगीची कागदपत्रे दिल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर अद्याप घरपट्टीसाठी फेरसर्वेक्षण झालेले नव्हते. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने अभियंत्यामार्फत सर्व कारखान्यांची मोजमापे घेतली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बांधकाम झालेले आढळले. त्यानुसार महापालिकेने २४० उद्योजकांना नोटिसा बजावून वाढीव घरपट्टीची मागणी केली; परंतु त्यास उद्योजकांनी विरोध केला. त्यानंतर आक्षेपांची सुनावणी सहायक आयुक्त चेतना केरूरे यांनी घेतली. त्यानंतरही असमाधान व्यक्त करणाऱ्या उद्योजकांच्या संघटनांनी माजी प्रभारी आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची भेट घेतली आणि कारखान्यात जे बांधकाम झाले ते वेदर शेड असून, ते बांधण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडून परवानगी घेतली आहे. तसेच काही उद्योजकांना मंजुरी मिळणार असून, त्यांनी तसे प्रस्ताव सादर केले आहेत, असे सांगितले. त्यानुसार डॉ. संजीवकुमार यांनी उद्योजकांना शेड उभारणीच्या परवानगीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती; परंतु या कालावधीत केवळ आठ ते दहा उद्योजकांनीन वाढीव बांधकाम आणि वेदर शेडच्या बांधकामाच्या परवानगीची कागदपत्रे सादर केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे उर्वरित सुमारे सव्वादोनशे उद्योजकांना अनधिकृत बांधकामाच्या घरपट्टीसह दंडाच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Notices to Savvansonesh Industries