शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस

By admin | Updated: July 17, 2017 00:16 IST

नाशिक : सातत्याने विविध तक्रारींमुळे चर्चेत राहणाऱ्या मनपाच्या बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलकर यांच्यासह दोघांना कामकाजातील सुधारणेबाबत नोटीस बजावण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सातत्याने विविध तक्रारींमुळे चर्चेत राहणाऱ्या मनपाच्या बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलकर यांच्यासह दोघांना कामकाजातील सुधारणेबाबत नोटीस बजावण्यात आली असून, शहरी आरोग्य केंद्रातील लेटलतिफ कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. नाशिकरोड येथील मनपा बिटको रुग्णालयाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून सातत्याने तक्रारी सुरू आहेत. महासभेसह स्थायी समितीच्या सभांमध्येही त्याबाबतचे पडसाद उमटले आहेत.  नाशिकरोड प्रभाग समितीच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच बिटको रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाबद्दल नापसंती दर्शविली होती, शिवाय वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलकर यांच्याबद्दलही तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार, वैद्यकीय विभागाने डॉ. फुलकर यांना कामकाजात सुधारणा करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.  दरम्यान, डेकाटे यांनी शनिवारी सकाळी अचानक मनपाच्या मोरवाडी, पिंपळगाव खांब आणि वडनेर येथील शहरी आरोग्य केंद्रांना भेटी देत तपासणी केली. मोरवाडी व पिंपळगाव खांब याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्ग वेळेत हजर असल्याचे निदर्शनास आले. मात्र, वडनेर येथील केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज सोनवणे हे हजर नसल्याचे आढळून आले. त्यांना डेकाटे यांनी दूरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी आपण फिल्डवर असल्याचे सांगितले.  परंतु सोनवणे यांनी मूव्हमेंट रजिस्ट्ररमध्ये नोंद केली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुख्यालयातील अधिकारी फिल्डवर असताना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर कामावर हजर राहणे आवश्यक आहे अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा डॉ. डेकाटे यांनी दिला.  दरम्यान, आपण कधीही केव्हाही शहरी आरोग्य केंद्रांची तपासणी करणार असून, लेटलतिफांवर कारवाई करणार असल्याची माहिती डेकाटे यांनी दिली.