एसटी ‘पास’ देण्याची सूचना

By Admin | Updated: July 2, 2015 00:10 IST2015-07-02T00:10:00+5:302015-07-02T00:10:40+5:30

कुंभमेळा : ‘हरित बस’चे लोकार्पण

Notice for giving 'ST' pass' | एसटी ‘पास’ देण्याची सूचना

एसटी ‘पास’ देण्याची सूचना

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना तिकीट काढण्याचा त्रास होऊ नये, याकरिता त्यांच्यासाठी पास योजना राबविण्याची सूचना राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आयोजित परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी, मुख्य स्थापत्य अभियंता जे. बी. इनामदार, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोडे, प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड, विभाग नियंत्रक यामिनी जोशी आदि उपस्थित होते.
पर्वणीकाळात सुमारे ५० लाख भाविकांची महामंडळाच्या बसेसद्वारे वाहतूक होणार असल्याने त्या सर्वांना बसचे तिकीट देण्यात जाणारा वेळ पाहता त्यांना ठरावीक रकमेच्या पासचे वितरण केल्यास त्यांची वाहतूक सुरळीत होऊ शकेल आणि वेळही वाचेल. त्यामुळे प्रत्येक बाह्य वाहनतळाच्या ठिकाणी भाविकांना पासेस मिळतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना रावते यांनी केल्या. यासाठी २०, ५० आणि १०० रुपयांच्या पासचे वितरण करण्याची सूचना त्यांनी केली. रावते म्हणाले, कुंभमेळा कालावधीत बाहेरून येणारी सर्व वाहने ही नाशिक शहराबाहेर थांबविली जाणार असून, शहरात भाविक एसटीने येणार आहेत. पर्वणी काळात भाविकांना तिकिटाऐवजी विशिष्ट रक्कम आकारून पास देण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Notice for giving 'ST' pass'