शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांना अवमानप्रकरणी नोटीस

By admin | Updated: August 19, 2016 00:34 IST

महापालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांना अवमानप्रकरणी नोटीस

नाशिक : शहरातील विविध ठिकाणी आणि प्रामुख्याने शासकीय कार्यालयांच्या परिसरात झाडांच्या बुंध्याभोवती असलेले डांबरीकरण आणि पेव्हर ब्लॉक न हटविल्याने नाशिक महापालिका, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना वृक्षप्रेमींनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत.निशिकांत पगारे व जसबीरसिंग यांनी अ‍ॅड. धीरेंद्र पोेंक्षे यांच्यामार्फत ही नोटीस बजावली आहे. शहरातील अनेक वृक्षांच्या भोवती डांबरीकरण करण्यात आले, तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. झाडांचे बुंधे आवळले गेल्याने त्यांच्या पालनपोषणाला अडथळा निर्माण होतो आणि शेवटी ही झाडे उन्मळून पडतात. यासंदर्भात जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्यानंतर २८ नोव्हेंबर २०१५ रोजी बुंध्याभोवतीचे डांबरीकरण आणि पेव्हर ब्लॉक तातडीने काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. इतकेच नव्हे तर वृक्षसंवर्धन व वृक्षांची योग्य ती काळजी घेणेबाबत भविष्यातही अशा प्रकारचे बांधकाम न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. परंतु त्यानंतरही महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने आदेश देऊनही महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिकरोड येथील विभागीय कार्यालय, पोलीस आयुक्तालय अशा विविध ठिकाणी डांबर आणि पेव्हर ब्लॉक झाडांच्या बुंध्याजवळ असून ते पंधरा दिवसांत हटवावे, अन्यथा अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)