शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मंडईत नव्हे, रस्त्यावरच भाजीबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:58 AM

शहरातील सराफ बाजारात वर्षानुवर्षे भरणाऱ्या फुलबाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेने गेल्या आठवड्यात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली व फुलविक्रेत्यांना गणेशवाडीतील भाजीमार्केटमध्ये जागा दिली.

नाशिक : शहरातील सराफ बाजारात वर्षानुवर्षे भरणाऱ्या फुलबाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेने गेल्या आठवड्यात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली व फुलविक्रेत्यांना गणेशवाडीतील भाजीमार्केटमध्ये जागा दिली. मात्र महापालिकेची पाठ फिरताच विक्रेते पुन्हा मूळ जागेवर येऊन बसले. त्यातून बराच वाद झाला असून, तो अद्यापही धुमसत आहे. शहरात फुलबाजाराप्रमाणेच रस्त्यावर भरणारे अनधिकृत भाजीबाजार हीदेखील एक डोकेदुखी झाली आहे. घराजवळच दररोज ताजा भाजीपाला मिळतो समाजाची ती गरज असली तरी, या बाजारामुळे वाहतुकीस होणारा अडथळा व त्यातून होणारे अडथळे या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांना व भाजीविक्रेत्यांना सोयीचे होईल, असे धोरण महापालिकेने आखणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ चमूने शहर व परिसरातील रस्त्यावर भरणाºया भाजीबाजाराची पाहणी करून त्यावर उपाययोजनांची माहिती संकलित केली. त्यात अनेक ठिकाणी अधिकृत बाजारासाठी जागा दिलेली असतानाही त्याकडे पाठ फिरवून विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी विक्रेत्यांना पर्यायी जागा देऊनही त्यांना जागेत स्वारस्य नसल्याचे जाणवले.इंदिरानगरला अधिकृत बाजाराकडे पाठइंदिरानगर परिसरात महापालिकेने साईनाथनगर चौफुली तसेच कलानगर येथे अधिकृत भाजीबाजार बांधून दिलेला असतानाही सावरकर चौक, राजे छत्रपती चौक ते सार्थकनगर बस थांब्यादरम्यान भरणारा अनधिकृत भाजीबाजार नागरिकांची डोकेदुखी वाढवित आहे. परिसरातील ग्राहकांची गरज ओळखून सावरकर चौकात अनधिकृत भाजीबाजार सुरू करण्यात आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात होतात. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन महापालिकेच्या वतीने साईनाथनगर चौफुली येथे भाजीबाजार बांधून देण्यात आला. सुमारे दीड वर्षापूर्वी भाजीबाजार साईनाथनगर येथील चौफुलीलगत स्थलांतरित केला, परंतु सायंकाळ होताच काही भाजीविक्रेते सावरकर चौकात ठाण मांडून बसतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसाच प्रकार कलानगर येथे घडतो आहे. याठिकाणी महापालिकेने सुमारे दहा वर्षांपूर्वी भाजीबाजार बांधून दिला आहे. तरीही राजे छत्रपती चौक ते सार्थकनगर बस थांबा या रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते व्यवसाय करतात.पंचवटीत पर्यायी जागेचा अभावपंचवटी येथील दिंडोरीरोड व पेठरोडवर दररोज सायंकाळी रस्त्यावरच भरणाºया अनधिकृत भाजीबाजारामुळे वाहनधारकांना वाहने नेणे तर सोडाच, परंतु रस्त्याने पायी ये-जा करणाºया नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. मुख्य वाहतूक असलेल्या रस्त्यावर भरणाºया भाजीबाजारामुळे नागरिकांसह मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढत असली तरी प्रशासनाकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने सध्या रस्त्यावरील भाजीबाजार प्रश्न प्रलंबित आहे. पेठरोडवर भाजीपाला विक्री करणाऱ्यांसाठी भाजीमंडई नाही की मोकळा भूखंड उपलब्ध नाही परिणामी विक्रेत्यांना रस्त्यावर बाजार थाटावा लागतो. अशीच परिस्थिती दिंडोरीरोड मुख्य वाहतूक रस्त्यावर दिसून येते. दररोज सायंकाळी महालक्ष्मी सिनेमा प्रवेशद्वार ते दिंडोरी नाक्यापर्यंत शेकडो भाजीपाला विक्रेते रस्त्यालगत बसलेले दिसून येतात. परिणामी वाहनधारकांना वाहने नेताना कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे दर आठवड्यात हिरावाडी तसेच औरंगाबाद रोडला भरणाºया आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते.

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका