शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

द्यायला नाही चेक, शेतकरी नाही घेत !

By admin | Updated: November 19, 2016 00:41 IST

आडते पेचात : शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; जिल्हाधिकारी मात्र हतबल

 नाशिक : बाजार समितीत दररोज हजारोच्या संख्येने शेतकरी शेतमाल घेऊन येतात, त्यांच्या मालाची रक्कम तीनशे ते आठशे रुपयांपर्यंत असते, इतक्या मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांना देण्यासाठी बॅँका चेक देत नाहीत आणि कमी रक्कमेचे चेक घेण्यास शेतकरी तयार नाहीत अशा पेचात सापडलेल्या भाजीपाला आडत्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी हतबलता पलीकडे काहीच आश्वासन दिले नाही. केंद्र सरकारच्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटबंदीचे थेट परिणाम शेतमाल विक्रीवर होऊ लागले आहेत. काही बाजार समित्यांनी व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाचा मोबदला थेट धनादेशाच्या माध्यमातून बॅँकेत जमा करण्यास सुरुवात केल्याने अन्नधान्य, कांदा अशा मोठ्या पिकांचे व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली असली तरी, सर्वात मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी, त्यांच्या मालाची हमी घेणारे आडते व खरेदीदार व्यापाऱ्यांना बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून व्यापाऱ्यांकडील रोख रक्कम म्हणजेच हजार, पाचशेच्या नोटा कवडीमोल झाल्याने शेतकऱ्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला, त्याचप्रमाणे आडत्यांकडेही शेतकऱ्यांना त्यांच्या पट्टीचे पैसे रोख स्वरूपात देण्यासाठी शंभर, पन्नासच्या नोटा शिल्लक नाही. अशा परिस्थिती शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच खराब होवून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दहा दिवसांत कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून, सरकारने शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे पेमेंट करण्याच्या सूचना आडते व व्यापाऱ्यांना केल्या असल्या तरी, प्रत्यक्षात त्याची व्यावहारिकता तपासल्यास अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. बॅँकांकडून व्यापारी असो वा आडते यांना पंचवीस ते पन्नास इतक्या संख्येचेच धनादेश बुक दिले जाते. मात्र शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात असताना त्या तुलनेने बॅँका धनादेश देत नाहीत. दुसरीकडे शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना लगेचच पट्टी म्हणजेच मालाचे पैसे हवे असल्याने ते थांबायला तयार नाहीत अशा पेचात आडते सापडले आहेत. त्यावर तोडगा निघावा म्हणून शुक्रवारी नाशिक बाजार समितीतील आडत्यांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांची भेट घेऊन परिस्थिती कथन केली. आडते व व्यापाऱ्यांना त्यांच्या बॅँक खात्यातून अधिक रक्कम काढण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जोपर्यंत व्यवहार सुरुळीत होत नाही तोपर्यंत ही मुभा मिळावी जेणे करून बाजार समितीतील व्यवहार सुरुळीत होतील व शेतकऱ्यांनाही त्यातून दिलासा मिळेल, अशी विनंती करण्यात आली.