शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

हाताला काम नाही अन् शेतात पीकही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 01:01 IST

पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला असून, सुरुवातीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लावणी केलेले नागली व वरई ही दोन्ही पिके ऐन वेळी पावसाने दडी मारल्याने रोपांच्या अक्षरश: काड्या झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यावर ऐन पावसाच्या दिवसात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, आधीच कोरोनाचे संकट डोक्यावर असताना आता खरीप हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरवर्षी भात व नागलीची लावणीनंतर बहुतांश शेतकरी मजुरीसाठी स्थलांतरित होतात. मात्र लॉकडाऊन-मुळे हाताला काम नाही व शेतात पीक नाही अशी गत झाली आहे. पर्यायी पिकांची चाचपणी भात किंवा नागलीचे पीक लावणीनंतर साधारण ९० ते १२० दिवसात येते. त्यातील ५५ दिवस उलटून गेल्याने आता लावणी करूनही उत्पादन येईल याची शाश्वती नसल्याने खरिपाची पिके पूर्णपणे वाया जाणार आहेत.शिवाय रोपे नसल्याने दुबार लावणी शक्य नसल्याने उर्वरित ४० ते ४५ दिवसात येणाºया पर्यायी पिकांची चाचपणी करण्याची मागणी होऊ लागली असून, कृषी विभागाने या संदर्भात मार्गदर्शन करून कमी कालावधीत व हवामानानुसार कोणती पिके घेता येतील त्याची बियाणे मोफत वाटप करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.-------------------------जून महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने माळरानावर नागली व वरईची लावणी केली; मात्र जुलैमध्ये कडक ऊन पडल्याने पूर्ण रोपे जळून खाक झाली असून, बियाणे, खते, मजुरी सर्व खर्च वाया गेला आहे. या वर्षी कोरोनामुळे ना शेती करता येत ना मजुरीला जाता येत, अशी शेतकरी व मजुरांची बिकट स्थिती झाली आहे.- जितेंद्र मोहरे, कळमबारी

टॅग्स :Nashikनाशिक