शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 01:07 IST

नाशिक : येत्या १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट आॅनलाइन पद्धतीने ‘फास्टस्टॅग’ अ‍ॅप्लिकेशनद्वारे रकमेचा भरणा करून वाहनचालकांना टोलनाक्यांवर न थांबता तत्काळ स्वतंत्र लेनमधून मार्गस्थ होता येईल. यासाठी मोटारीच्या आतील बाजूने चालकाच्या जवळ एक विशिष्ट प्रकारचे ‘फास्टस्टॅग स्टिकर’ लावणे बंधनकारक राहणार आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र लेन : ‘फास्टस्टॅग’ स्टिकरद्वारे थेट आॅनलाइन होणार कपात

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : येत्या १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट आॅनलाइन पद्धतीने ‘फास्टस्टॅग’ अ‍ॅप्लिकेशनद्वारे रकमेचा भरणा करून वाहनचालकांना टोलनाक्यांवर न थांबता तत्काळ स्वतंत्र लेनमधून मार्गस्थ होता येईल. यासाठी मोटारीच्या आतील बाजूने चालकाच्या जवळ एक विशिष्ट प्रकारचे ‘फास्टस्टॅग स्टिकर’ लावणे बंधनकारक राहणार आहे.देशाचे इंधन आणि नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (ईटीसी) २०१६ साली सुरू केले गेले होते. अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेदेखील ईटीसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून, एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तिपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत. तसेच वाहनचालकांना माहितीपत्रकांचेही वाटप करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, घोटी टोलनाक्यावर सुमारे १० हजार, पिंपळगाव टोल नाक्यावर ३५ हजार फास्टस्टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या अत्याधुनिक आॅनलाइन टोल पेमेंटमुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा यापुढे दिसणार नाही, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे....तर भरावी लागेल दुप्पट रक्कमएखादा वाहनचालक अनवधानाने जरी ‘फास्टटॅग’च्या विशिष्ट लेनमध्ये आला तर त्या वाहनचालकाला दुप्पट रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी याबाबत नोंद घेत लेन खुली आहे म्हणून आपले वाहन फास्टटॅग लेनवर आणू नये, तत्पूर्वी सूचनाफलक अवश्य वाचावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांच्या वाहनांना फास्टटॅगचे स्टिकर लावलेले आहेत, त्यांच्यासाठी विशेष लेन राखीव असणार आहे.गूगल प्ले-स्टोअरर माय ‘फास्टटॅग’ फास्टटॅग स्टिकर कोणत्याही टोलनाक्यावर, पेट्रोलपंप, बॅँक क ाउंटरकडून सहज उपलब्ध होऊ शकेल, असा दावा एनएचएआयकडून करण्यात आला आहे. फास्टटॅग खरेदी केलेल्या वाहनचालकाच्या बॅँक खात्यातून किंवा आॅनलाइन पेमेंट खात्याच्या वॉलेटसोबत फास्टटॅग जोडलेला असेल, त्यामुळे ते स्टिकर चिकटविलेले वाहन जेव्हा टोलनाक्यावरील विशिष्ट लेनमध्ये येईल तेव्हा स्वयंचलित यंत्रणेमार्फत वाहनापुढील बार खुला होईल आणि वाहन सहजरीत्या पुढील प्रवासाकरिता मार्गस्थ होईल, असा दावा पाटील यांनी बोलताना केला. गूगलवर ‘माय फास्टटॅग’ नावाचे अ‍ॅपदेखील उपलब्ध आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाNashikनाशिक