शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन हक्क संघटनेचा निर्धार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा पेठ तालुकास्तरीय निर्धार मेळावा आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

पेठ : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा पेठ तालुकास्तरीय निर्धार मेळावा आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय- निमशासकीय सेवेत रु जू झालेल्या कर्मचाºयांना केंद्र शासनाने अंशदायी पेन्शन योजना लागू केली असून, सदरची योजना रद्द करून जूनीच पेन्शन योजना लागू करावी यासाठी निर्धार मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार-खासदार यांना निवेदन देण्याऐवजी त्यांच्याकडूनच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची शिफारस या कार्यक्रमात घेण्यात आली. कर्मचाºयांच्या पाठीशी उभे राहणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून, जुनी पेन्शन लागू करून लाखो कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी सांगितले. मेळाव्यात संघटनेच्या वतीने आगामी काळात करावयाचे आंदोलने, अंशदायी पेन्शन योजनेची कपात बंद करणे, नकारपत्रके भरून घेणे, जिल्हा मेळाव्याची पूर्वतयारी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस गोरख देवडे, दिंडोरी अध्यक्ष दिगंबर बागाड, निफाड अध्यक्ष नवनाथ सुरवडे, केंद्रप्रमुख मोतीराम सहारे, शिक्षक संघाचे अध्यक्ष आर.डी. शिंदे, आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोये, राज्य संघटक प्रविण गायकवाड, तालुकाध्यक्ष अनिल सांगळे, संजय सुसलादे, नमन कुलकर्णी, चंद्रशेखर पठाडे, गणेश रोकडे, सतीश शंकरे, अक्षय ढोले, नवनाथ म्हस्के यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.रमेश वाघ यांनी सुत्रसंचलन केले.