नवीन मराठी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:31+5:302021-02-05T05:43:31+5:30

जेल रोड सानेगुरुजी नगर येथील नवीन मराठी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापिका मंगला गोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. ...

New Marathi school | नवीन मराठी शाळा

नवीन मराठी शाळा

जेल रोड सानेगुरुजी नगर येथील नवीन मराठी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापिका मंगला गोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी गोविंद दंडे आणि सन्स यांच्यावतीने चौथीच्या दोन आदर्श विद्यार्थ्यांना चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संस्थेच्या पतपेढीतर्फे गुणवंत पालक पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमास शालेय समिती सदस्य संजय खरोटे, शालेय पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन महानंदा पवार यांनी केले.

फोटो कॅप्शन

नाशिक रोड जेल रोड येथील नवीन मराठी शाळेत प्रजासत्ताक दिनी चौथीच्या दोन आदर्श विद्यार्थ्यांना चांदीचे पदक देऊन गौरव करताना मुख्याध्यापिका मंगला गोविंद, संजय खरोटे आदी. (फोटो:२७एनएमसी स्कूल नाशिक रोड)

Web Title: New Marathi school