महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:22 AM2019-05-28T00:22:07+5:302019-05-28T00:22:23+5:30

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आहे.

 The need to replace old underground sewage in Mahadevanagar | महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलण्याची गरज

महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलण्याची गरज

Next

सातपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या शौचालयांची योजना सातपूर परिसरातील महादेववाडीत चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मात्र या शौचालयांचे आउटलेट जुन्या असलेल्या भूमिगत गटारींना जोडल्याने या गटारी तुंबल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली असून, घरात शौचालय असून वापरता येत नसल्याने कुटुंबीयांची फरफट होत आहे.
महादेवनगरातील जुन्या भूमिगत गटारी बदलून मोठ्या व्यासाची पाइपलाइन टाकणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषत: सातपूर बसस्टँडच्या आवाराचा शौचालयासाठी वापर केला जात होता. यात वयोवृद्ध महिला, तरु णी यांची मोठी हेळसांड होत होती. महादेवनगरात शौचालय उभारणीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. महानगरपालिकेने या वसाहतीत हागणदारीमुक्त योजनादेखील राबविली होती. शौचालयासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने अनेक वेळा अपघातदेखील झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, महानगरपालिकेने एका कोपऱ्यात सुलभ शौचालय उभारून दिलेले आहे. पैसे देऊन या शौचालयाचा वापर करावा लागत असल्याचे रामेश्वर गायकवाड यांचे म्हणणे आहे.
या भूमिगत गटारी फार पूर्वीच्या आणि कमी व्यासाच्या पाइपलाइन असल्याने तुंबण्याचे प्रमाण वाढले. गटारी तुंबू लागल्याने घरात दुर्गंधी पसरू लागली. परिणामी घरात शौचालय असून, वापरता येणे अवघड झाले आहे. म्हणून काहींनी पुन्हा उघड्यावर जाणे पसंत केले आहे. अन्यथा पैसे देऊन सुलभ शौचालयाचा वापर करावा लागत आहे. काही लोकांना प्रत्येकवेळी पैसे देणे परवडत नाही. जुन्या झालेल्या भूमिगत पाइपलाइन बदलण्याची मागणी उषा खरात, बाळू खैरे यांनी केली आहे.
या भागात नंदिनी नदीकाठी अनेक वर्षांपूर्वी दोन ठिकाणी महानगरपालिकेने सार्वजनिक शौचालय उभारलेले आहेत. परंतु या शौचालयांची देखील मोडतोड झाल्याने साफसफाई अभावी कोणीही वापर करीत नसल्याचे आयेशा शेख, कल्पना सोनवणे यांचे म्हणणे आहे. प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने रोगराई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या वसाहतीतील पथदीपांवरील बल्बचा उजेड फारच कमी पडत असल्याने एलइडी बल्ब बसविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या भागात तत्कालीन नगरसेवक अ‍ॅड. वसुधा कराड यांच्या नगरसेवक निधीतून समाजमंदिर उभारण्यात आलेले आहे. या समाजमंदिराचे अद्याप लोकार्पण झालेले नाही. लाखो रु पये खर्चून बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचा वापर गर्दुल्यांसाठी आणि शौचालयासाठी होत असल्याचे धोंडिबा गायकवाड यांनी सांगितले़ चढ-उतार असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. उतार असलेल्या भागात मुबलक पाणी मिळते, तर चढ असलेल्या भागात पाणी मिळत नाही. डास फवारणीसाठी कोणीही कर्मचारी या भागात फिरकत नसल्याची तक्रार मुरलीधर चव्हाण यांनी केली आहे.
वसाहतीत मुख्य समस्या शौचालयाची
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूर गावालगत प्रभाग क्र मांक ११ मध्ये महादेवनगर वसाहत आहे.
जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतीतील संपूर्ण रस्ते सीमेंट काँक्र ीटचे बनविण्यात आलेले
आहेत. तरीही काही समस्या अजूनही मूळ धरून आहेत. या वसाहतीत मूळ समस्या शौचालयाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना शौचालयासाठी उघड्यावर जावे लागत होते. त्यामुळे शौचालयाची मागणी करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घराघरांमध्ये शौचालयांची योजना आणली. महानगरपालिकेने महादेवनगरात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. येथील नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. घरात शौचालय आले खरे, पण आउटलेटची सोय मात्र करण्यात आली नाही. म्हणून नागरिकांनी भूमिगत असलेल्या सांडपाण्याच्या गटारी या शौचालयांचे आउटलेट जोडून घेतले.

Web Title:  The need to replace old underground sewage in Mahadevanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.