पेठ पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त असून, दाेन अधिकारी व ३० कमर्चारी वर्ग कार्यरत आहे. विशेष म्हणजे दुर्गम तालुका असूनही या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी एकही पद रिक्त नाही. गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चौक्यांची संख्या वाढवल्यास पोलीस स्टेशनवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल. पेठ तालुक्याची जवळपास एक लाख ३६ हजार लोकसंख्या असली तरी पोलीस विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमाद्वारे प्रचार व प्रसाराने गुन्ह्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}