शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे कांदा फेको आंदोलन

By admin | Updated: August 24, 2016 22:13 IST

कळवण, नांदगाव, चांदवड : तहसीलवर पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा मोर्चा

कळवण : कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून, उत्पादन शुल्कदेखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी कळवण येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर बुधवारी (दि. २४) राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने कांदा फेको आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे यांनी यावेळी केली. यापूर्वीदेखील या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात रास्ता रोको व अन्य आंदोलने करण्यात आली. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जाग येत नसून शेतकऱ्यांची कीवसुद्धा येत नसल्याने सरकार कांद्याबाबत काहीही निर्णय घेत नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे.भाजपा-शिवसेना युती सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा या मागणीसाठी आज बुधवारी कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कांदा फेको आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, पंचायत समितीचे उपसभापती अ‍ॅड. संजय पवार, पंचायत समिती सदस्य हिरामण पगार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अलकाताई कनोज, नगरसेवक जयेश पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, पांडुरंग पाटील, शेतकरी नेते महेंद्र हिरे, विलास रौंदळ, अमोल पगार, यशवंत देशमुख, सुभाष शिरोडे, कौतिक गांगुर्डे, भाऊसाहेब पवार, पंकज पाचपिंड, पंकज जाधव, आशुतोष अहेर, मनोहर बोरसे, सनी बोरसे, उमेश सोनवणे, सागर खैरनार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)