शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या नामांतरावरून राष्ट्रवादीची कॉँग्रेसकडून ‘कोंडी’

By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST

बांधकाम समितीच्या सभेवर बहिष्कार

नाशिक : स्थायी समितीवरील कॉँग्रेसचे सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सभागृहाला दिले जात नाही म्हणून बहिष्कारास्त्र उपसले असताना, आता त्याचेच पुढचे पाऊल म्हणून कॉँग्रेसच्या तिघा सदस्यांनी बांधकाम समितीच्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्ष जयश्री पवार आणि बांधकाम समितीच्या अध्यक्ष अलका जाधव या दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या असल्याने बहिष्कार टाकणारे कॉँग्रेसचे सदस्य आहेत. त्यामुळे कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी ठिणगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामांतरावरून जिल्हा परिषदेत पडली आहे. यासंदर्भात कॉँग्रेसचे बांधकाम समितीचे सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे, अ‍ॅड. संदीप गुळवे व सोमनाथ फडोळ यांनी प्रा. अनिल पाटील यांची मागणी उचलून धरले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वच पक्ष राजकारण करीत असताना व दोन-दोन सभागृहांना एकाच कर्मवीरांचे नाव असताना, ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले त्या छत्रपतींंच्या नावालाच आज असा विलंब का केला जात आहे? त्याचे परिणाम
आगामी विधानसभा निवडणुकीत उमटू शकतात. दोनपैकी एका सभागृहाला छत्रपतींचे नाव देण्याला तसे
पाहता कोणाचाही विरोध असता कामा नये.
मात्र सातत्याने दोन वर्षांपासून एका शुल्लक नामांतराच्या मागणीसाठी सदस्यांना सभात्याग आणि बहिष्कार टाकावा लागतो हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रशांत सोनवणे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामांतरावरून आता जिल्हा परिषदेत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)