शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉँग्रेसला हवेय मनगटात ‘बळ’

By admin | Updated: January 13, 2017 00:28 IST

भाजपातर्फे उमेदवारांचा शोध : अध्यक्षपदाचा शिवधनुष्य पेलण्यास सेना उत्सुक

गणेश धुरी नाशिक
जिल्हा परिषदेत गेल्या तीन पंचवार्षिकपासून एकहाती सत्ता मिळविणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला नेतृत्वाअभावी काहीसे कमजोर झाल्याचे चित्र आहे. याचे प्रमुख कारण जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता येण्यामागे एकखांबी नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच असल्याचे नाकारता येणार नाही. तूर्तास ते कायदेशीर कचाट्यात सापडल्याने राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी व आगामी निवडणुकांची लढाई जिंकण्यासाठी मनगटात ‘बळ’ हवे आहे.
दुसरीकडे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचलेले नेटवर्क आणि कार्यकर्त्यांची फौज पाहता पांडुरंग राऊत यांच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर भगवा फडविण्यासाठी शिवसेना जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमध्ये उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. अर्थात सत्ता असल्याने त्यांना उमेदवार मिळतीलही, मात्र उमेदवारीचे विजयात रूपांतर करणारे इच्छुक मिळतीलच याची शाश्वती नाही. भाजपाच्या जिल्हा नेतृत्वाने तसेही ग्रामीण भागात भाजपाला जास्त जोर द्यावा लागेल, असे याआधीही कबूल केले आहे. शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या कॉँग्रेसला मिनी मंत्रालयात खूपच खडतर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यांचे १४ सदस्य असताना नाशिक महापालिकेतील मनसेप्रमाणेच जिल्हा परिषदेत कॉँग्रेसला गळती लागली आहे. माजी आमदार अ‍ॅड. अनिलकुमार अहेर यांना तर त्यांच्या घरातूनच बंधू विलास अहेर यांच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सामना करण्याची वेळ आली आहे. इगतपुरीत संदीप गुळवे शिवसेनेत गेल्याने आमदार निर्मला गावितांना इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातून कॉँग्रेसच्या जागा टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. माकप त्यांच्या सुरगाणा तालुक्यापुरता मर्यादित राहण्याची शक्यता अधिक आहे. नाही म्हणायला दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर येथूनही माकपाला एखाद दोन जागांची अपेक्षा आहे. मनसेचे तीन सदस्य मागील पंचवार्षिकमध्ये निवडून आले होते. मात्र यंदा खाते खोलण्यासाठीही रेल्वे इंजिनाला जोर लावावा लागेल. परंतु मागील वेळेची तीन सदस्यांची पुनरावृत्ती मनसेला अवघड आहे.