नाशिक : नवरात्रोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असल्याने शहरात तयारीला वेग आला आहे. नाशिकचे ग्रामदैवत असलेले कालिकामाता मंदिर, रविवार कारंजा येथील रेणुकामाता मंदिराबरोबरच शहरातील अन्य मंदिरांमध्येही रंगरंगोटीची कामे पूर्ण होत आहेत. त्यामुळे देवीमंदिरे झळाळून निघाली आहेत. याशिवाय बाजारपेठेतही खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. बाजार फुलला४नवरात्रात घरात मातीचे घट बसवून देवीची पूजा केली जाते. त्यामुळे बाजारात घट मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यांच्या खरेदीसाठी बाजारात गृहिणी गर्दी करीत आहेत. तरुण-तरुणींमध्येही गरबा-दांडियाच्या पार्श्वभूमीवर जोरदार खरेदी सुरू आहे. अनेक जण नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे पोशाख घालतात. त्यांच्या खरेदीसाठीही झुंबड उडत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}