राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:59 AM2019-10-09T00:59:50+5:302019-10-09T01:02:17+5:30

नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून, रस्तेमार्गे ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी पोहचणार आहेत.

Nation's husband Ramnath Kovind was in Nashik on a two-day visit | राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये

राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये

Next
ठळक मुद्देशासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी पोहचणार

नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून, रस्तेमार्गे ते शासकीय विश्रामगृह येथे मुक्कामी पोहचणार आहेत.
ओझर येथे राष्टÑपतींच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
गुुरुवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह येथून राष्टÑपती आर्टिलरी सेंटरकडे रवाना होणार आहेत. लढाऊ विमानांच्या वैमानिकांचे प्रशिक्षण देणारे गांधीनगर येथील एव्हिएशन हे देशातील सर्वांत जुने केंद्र असून, येथील एव्हिएशनने देशाच्या आर्मीत दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते फ्लॅग प्रदान सोहळा होणार आहे. १८२८ मध्ये मुंबईत स्थापन झालेले देशातील हे सर्वात जुने एव्हिएशनचे केंद्र असून, काही तांत्रिक कारणांमुळे साधारणपणे ३४ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये सदर केंद्र स्थलांतरित करण्यात आले. देशाच्या आर्मीला बळ देणारे वैमानिक घडविणाºया केंद्राच्या कार्याेचा गौरव म्हणून राष्टÑपती या केंद्राचा फ्लॅग देऊन गौरव करणार आहेत.
या कार्यक्रमानंतर दहा किलोमीटरवर आर्टिलरी हद्दीतील तोफखाने रेंजनजीक उभारण्यात आलेल्या ‘रुद्रनाद’ या संग्रहालयाचे उद्घाटन राष्टÑपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, राष्टÑपतींच्या दौºयानिमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून रस्ते मार्गावरून रंगीत तालीम, शासकीय विश्रामगृह ते आर्टिलरी कॅॅट सेंटरपर्यंतच्या मार्गावरील नियोजनासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. राष्टÑपती कोविंद यांच्यासोबत ४० अधिकारी, तसेच सुरक्षारक्षकांचा स्टाफ असणार आहे.

Web Title: Nation's husband Ramnath Kovind was in Nashik on a two-day visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.